शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

सराफा प्रतिष्ठानांवर आयकर छापे

By admin | Updated: January 19, 2017 02:57 IST

केजे स्क्वेअर, खंडेलवाल अलंकार केंद्र, विश्‍वकर्मा ज्वेलर्सची झाडा-झडती.

सचिन राऊत अकोला, दि. १८- नोटाबंदी झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत सोन्याच्या दागिन्यांसह सोन्याच्या बिस्किटांची मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री करणार्‍या अकोल्यातील बड्या आणि नामांकित असलेल्या तीन सराफा व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांवर आयकर खात्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी छापेमारी केली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या तब्बल ३0 अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या पथकाने गांधी चौकातील केजे स्क्वेअर (खंडेलवाल ज्वेलर्स), खंडेलवाल अलंकार केंद्र आणि विश्‍वकर्मा ज्वेलर्सची संशयावरून तपासणी केल्याची माहिती पथकातील एका अधिकार्‍याने दिली.नोटाबंदीनंतर दोन दिवसांमध्ये सोने आणि चांदीची मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री केल्याच्या संशयावरून नागपूर येथील आयकर खात्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या तब्बल ३0 अधिकार्‍यांच्या पथकाने बुधवारी अकोल्यातील वसंत खंडेलवाल यांच्या मालकीच्या खंडेलवाल अलंकार केंद्र, नितीन खंडेलवाल व रवी खंडेलवाल यांच्या मालकीच्या केजे स्क्वेअर आणि केजे-१ व जांगिड यांच्या मालकीच्या विश्‍वकर्मा ज्वेलर्सवर छापेमारी केली. बुधवारी सकाळी ११ वाजेपासून ही तपासणी सुरू केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरूच होती. या छापेमारीत त्यांनी सोने आणि चांदी खरेदी-विक्रीचे दस्तावेज व देयक तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. नोटाबंदी नंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी सोने व चांदीची चढय़ा भावाने मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्याचा संशय आहे. गोपनीय खात्याने दिलेल्या अहवालानंतर या संशयावरूनच ही छापेमारी करून तपासणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र शासनाने ८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर काळा पैसा असलेल्यांची चांगलीच धांदल उडाल्याने त्यांनी सोन्याचे दागिने आणि सोन्याचे बिस्कीट मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्याचा अहवाल गोपनीय खात्याने शासनाला सादर केला होता. देशातील सराफा व्यावसायिकांनी या संधीचा फायदा घेत तीन हजार रुपये भाव असलेले सोने तब्बल पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति एक ग्रॅम याप्रमाणे विक्री केले होते, तर बेहिशेबी पैसा बाळगणार्‍यांनी पैसा फे कल्यापेक्षा चढय़ा दराने का होईना, त्या दोन दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणात सोन्याची खरेदी केली होती. काळा पैसा पांढरा करण्यासाठी सोने खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता आयकर खात्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाकडून छापेमारी करण्यात येत आहे. आयकर खात्याच्या तीस अधिकार्‍यांचे पथकअकोल्यातील खंडेलवाल अलंकार केंद्र, विश्‍वकर्मा ज्वेलर्स आणि केजे स्क्वेअर या तीन सराफा प्रतिष्ठानांची झाडाझडती घेण्यासाठी नागपूर येथील तब्बल ३0 च्यावर अधिकार्‍यांचा समावेश असलेले पथक दाखल झाले आहे. या पथकाने बुधवारी सकाळी ११ वाजेपासूनच तीनही प्रतिष्ठानांची झडती घेतली असून, महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याची माहिती पथकातील एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.तीन दिवस चालणार तपासणीनागपूर येथील आयकर खात्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने (डायरेक्टर ऑफ इन्व्हेस्टिगेशन) बुधवारी सुरू केलेली तपासणी आणखी तीन दिवस चालणार असल्याची माहिती आहे. शहरातील तीन सराफा प्रतिष्ठानांची तपासणी बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी आणि शुक्रवारी आणखी काही प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.ज्वेलर्स बंद असताना छापेमारीबुधवारी ज्वेलर्स बंद ठेवण्यात येतात; मात्र आयकर खात्याने बुधवारीच छापेमारी करून दस्तावेज तपासणी सुरू केली आहे. येणारे दोन दिवस ही तपासणी सुरूच राहणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.आणखी सराफ रडारवरशहरासह जिल्हय़ातील आणखी काही सराफा प्रतिष्ठान आयकर खात्याच्या रडारवर आहेत. येणार्‍या दोन दिवसांमध्ये या सराफा प्रतिष्ठानांची झडती घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. अकोला शहरासह अकोट, मूर्तिजापूर येथीलही काही सराफा प्रतिष्ठानांची तपासणी होणार असल्याची माहिती आहे.