शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

प्राप्तिकर अधिका-याला सीबीआयकडून अटक

By admin | Updated: December 30, 2016 19:49 IST

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 30 - प्राप्तिकर विभागाच्या एका निरीक्षकाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. सारसबागेजवळील विश्व हॉटेलजवळ गुरुवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या घरझडतीमध्ये तब्बल 4 लाख 46 हजारांच्या नवीन नोटा आढळून आल्या आहेत. यासोबतच सोन्याची बिस्किटेही आढळून आल्याची माहिती अधीक्षक एम. आर. कडोळे यांनी दिली. राजेंद्र बी. दोंड असे अटक केलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश ढमाले यांनी सीबीआयकडे तक्रार दिली होती. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, दोंड हा प्राप्तिकर विभागामध्ये अधिकारी आहे. प्राप्तिकर विभागाच्या असेसमेंट विभागामध्ये त्याची नेमणूक वॉर्ड क्रमांक 2 (2) चा प्रभार त्याच्याकडे आहे. ढमाले यांनी 2013 मध्ये सदनिका व एक दुकान खरेदी केले होते. या दुकानाचा रेडी रेकनरचा दर आणि खरेदी किमती यामध्ये 35 लाखांची तफावत येत होती. दोंड याने याच कारणावरुन त्यांची अडवणूक करीत प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. यामधून सुटका हवी असल्यास 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.ढमाले यांनी सीबीआयच्या एसीबीकडे याबाबत तक्रार दाखल केली. अधिका-यांनी गुरुवारी संध्याकाळी सारसबागेजवळील विश्व हॉटेलजवळ सापळा लावला. लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारताना दोंड याला रंगेहात पकडण्यात आले. त्याला अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या एका पथकाने दोंड याच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घराची कसून झडती घेण्यात आली आहे. त्याच्या घरामध्ये दोन हजार रुपयांच्या तब्बल 223 नोटा आढळून आल्या आहेत. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. यासोबतच 350 ग्रॅम सोन्याची बिस्कीटे, पुण्यात दोन फ्लॅट आणि सोलापूर येथील जमिनीची कागदपत्रे मिळून आली आहेत. दोंड याची विविध बँकांमध्ये बारा खाती असून एका बँकेत लॉकर आहे. या लॉकरची तपासणी सुरु असल्याचे अधीक्षक एम. आर. कडोळे यांनी सांगितले.