शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आयकर सहआयुक्तास लाच घेताना अटक

By admin | Updated: December 12, 2015 02:31 IST

एका बिल्डरकडून पाच लाखांची लाच स्वीकारताना आयकर विभागाचे सहआयुक्त संतोष जांगरे यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या लाचलुचपत विरोधी विभागाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली

मुंबई : एका बिल्डरकडून पाच लाखांची लाच स्वीकारताना आयकर विभागाचे सहआयुक्त संतोष जांगरे यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या लाचलुचपत विरोधी विभागाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली असून, जांगरेच्या पवईतील तीन बंगल्यांवर धाड टाकून सीबीआयने दीड किलो सोने आणि मालमत्तेशी संबंधित दस्तावेज जप्त केले. किडनीचा आजार आणि मधुमेह असल्याचे कोर्टाला सांगितल्याने त्याची रवानगी कोठडीत होण्याऐवजी त्यास जे. जे. इस्पितळात दाखल करण्यात आले.मागच्या वर्षी दाखल करण्यात आलेले कर निर्धारण (असेसमेन्ट) फेरतपासणीस घेणाऱ्या जांगरेने ३० लाख रुपये दिले नाहीत, तर १.२० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची धमकी सांताक्रूझ येथील एका बिल्डरला दिली होती. पिरामल चेम्बर्समधील आयकर विभागाच्या कार्यालयात सहआयुक्त असलेल्या जांगरेविरुद्ध ९ डिसेंबर रोजी तक्रार करण्यात आली होती. तक्रारदाराच्या चार्टर्ड अकाउंटंटला जांगरे अशी धमकी दिली की, कर निर्धारण फाइल पुन्हा उघडली असून, प्रकरण मिटविण्यासाठी तक्रारदाराने तातडीने भेट घ्यावी. सुरुवातीला जांगरेने बिल्डरकडे ३० लाख रुपये मागितले. नंतर २५ लाखांवर सौदा केला. त्यापैकी पहिल्या हप्त्यापोटी ५ लाख रुपये देण्याचे ठरले. बाकी रक्कम १० ते १५ दिवसांत देण्यास सांगितले, असे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले. बिल्डरच्या तक्रारीनंतर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून बिल्डरला पाच लाख रुपयांसह जांगरेला भेटण्यास पाठविले. जांगरेने फोन करून बिल्डरला आयकर कार्यालयानजीकच्या हनुमान मंदिराजवळ बोलावले. बिल्डर त्या ठिकाणी आल्यानंतर जांगरेने त्याला स्वत:च्या कारमध्ये बसण्यास सांगितले. कार काही अंतर पुढे नेत बिल्डरकडून पैसे घेतले. त्यानंतर कार थांबवून बिल्डरला कारमधून उतरण्यास सांगितले. तोच आम्ही त्याची कार अडवून त्याला लाच घेतांना रंगेहाथ अटक केली, असे सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले. जांगरेची रवानगी पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत करायची की नाही, याचा निर्णय जांगरेचा वैद्यकीय अहवाल पाहिल्यानंतर घेतला जाईल, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. देशपांडे यांनी शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)