शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ५,९७९ गावांचा पेसा क्षेत्रांतर्गत समावेश - सावरा

By admin | Updated: April 2, 2016 01:25 IST

पंचायत अनुसूचित क्षेत्र विस्तार अधिनियम (पेसा) क्षेत्राअंतर्गत राज्यातील १३ जिल्ह्यांतील ६० तालुक्यांतील २,८७३ ग्रामपंचायती व ५,९७९ गावांचा समावेश असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री

मुंबई : पंचायत अनुसूचित क्षेत्र विस्तार अधिनियम (पेसा) क्षेत्राअंतर्गत राज्यातील १३ जिल्ह्यांतील ६० तालुक्यांतील २,८७३ ग्रामपंचायती व ५,९७९ गावांचा समावेश असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.पेसा कायद्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायती तसेच महसुली गावांचे कालांतराने विभाजन होऊन त्या मूळ ग्रामपंचायत किंवा महसूल गावापासून स्वतंत्र महसूल गाव किंवा स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झालेल्या गावांचा पेसा कायद्यामध्ये समावेशाची सुधारित यादी प्रशासनाने प्रसिद्ध करावी याबाबतची लक्षवेधी डी. एस. अहिरे यांनी मांडली होती.ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हे आदिवासी क्षेत्रात येतात. तेथे ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकूण निधीच्या ५ टक्के या गावांना खर्चासाठी देण्याची मान्यता दिली आहे. या वर्षीचा ५,१७० कोटींच्या ५ टक्के म्हणजेच २५८.८० कोटी निधी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे. १८०.९५ कोटी वरील १३ जिल्ह्यांतील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना वितरित केल्याचे सावरा यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी) नव्याने सर्वेक्षण : राज्यातील आदिवासी क्षेत्र निश्चित करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. १९८५च्या अधिसूचनेनुसार राज्यातील सध्याचे अनुसूचित क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. यात बदलाचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रास पात्र असून, यादीत समावेश नसलेल्या गावांबाबत २०११च्या जनगणनेनुसार सर्वेक्षण करून नवा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे सावरा यांनी सांगितले.