शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या नावात ‘महाराज’ या उपाधीचा समावेश करा

By admin | Updated: February 20, 2016 03:18 IST

छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नावात शिवरायांच्या ‘महाराज’ या उपाधीचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे यांनी शुक्रवारी केली.

मुंबई : छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नावात शिवरायांच्या ‘महाराज’ या उपाधीचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे यांनी शुक्रवारी केली. शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या आॅल इंडिया एव्हिएशन एम्प्लॉईज असोशिएशन आणि राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्यावतीने विमानतळावर शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते विमानतळासमोरील शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी आ. हनुमंत डोळस, आ. निरंजन डावखरे, आ. नरेंद्र पाटील, आ. राहुल नार्वेकर, चित्रा वाघ आणि सिद्धी विनायक मंदीर न्यासचे अध्यक्ष नरेंद्र राणे व्यासपीठावर होते. यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष आमदार किरण पावसकर यांनी विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला. विमानतळाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्यात यावे, यासाठी गेली अनेक वर्षे आपण पाठपुरावा करत आहोत. जीव्हीके विमानतळ प्रशासनाने जनतेच्या भावना लक्षात घेत विमानतळाच्या नावात ‘महाराज’ या उपाधीचा समावेश करावा, अशी मागणी पावसकर यांनी केली. यानंतर सभापती निंबाळकर आणि उपसभापती डावखरे यांनी छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नावात महाराज या उपाधीचा समावेश व्हावा या पावसकर यांच्या मागणीला मान्यता दिली. याविषयी जीव्हीके कंपनीला विमानतळाच्या नावात बदल करण्याचे सूचित केले व शासकीय स्तरावर असा बदल करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन आपल्या भाषणातून केले. या कार्यक्रमास मुंबई युवक अध्यक्ष मनोज व्यवहारे, मुंबई सरचिटणीस सलिम माफखान, वेंकटेश मानव, जावेद देऊळकर, सरचिटणीस गणेश शेट्टी, चैतन्य माईनकर, धीरज सावंत, नितीन कासारे आणि युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.