शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी महिलेला दिले अगरबत्तीचे चटके

By admin | Updated: September 29, 2016 01:20 IST

अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार; महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केले.

सचिन राऊतअकोला, दि. २८- मानसिक आरोग्य बिघडलेल्या महिलेची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या नातेवाईकांनी भोंदू बाबाकडून उपचार करून घेतले. यामध्ये सदर महिलेच्या शरीरावर चक्क अगरबत्तीचे चटके दिल्याचा अघोरी प्रकार उघड झाला आहे. या महिलेवर शहरातील एक मानसोपचार तज्ज्ञ उपचार करीत असून, सध्या तिची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे.जिल्हय़ातील एका गावातील विवाहित महिलेची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तिला पुर्ववत बरे करण्यासाठी गावातीलच काही अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांनी तिला भोंदू बाबाकडे नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सदर महिलेला भोंदू बाबाला दाखविले असता, भोंदू बाबाने तिचा आजार दूर करण्यासाठी या महिलेला अगरबत्तीचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला. संपूर्ण शरीरावर चटके दिल्यानंतरही महिलेची प्रकृती ठीक न झाल्याने तिला शहरातील मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी आणण्यात आले. मानसोपचार तज्ज्ञांनी या महिलेवर उपचार केल्यानंतर त्या महिलेची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती आहे. आजच्या युगात वैद्यकीय क्षेत्रातही अनेक नवनवीन शोध लावण्यात येत आहेत. प्रत्येक आजारावर विविध लस उपलब्ध करून आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी जगातील प्रत्येक देशात स्पर्धा सुरू आहे. यामध्ये भारतही कुठे कमी नाही; मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आजही अनेक ठिकाणी अंधश्रद्धेचे अघोरी प्रकार सुरूच असल्याचे वास्तव या घटनेने समोर आले आहे. त्यामुळे अशा भोंदू बाबांचे चेहरेही पोलिसांनी उघड करण्याची गरज निर्माण झाली आहे.विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग असतानाही अंधश्रद्धेवर विश्‍वास असणार्‍या एकाने सदर महिलेला अगरबत्तीचे चटके दिले; मात्र त्यानंतरही महिलेची मानसिक स्थिती ठीक झाली नाही. तिच्यावर उपचार केल्यानंतर आता महिला ठीक आहे.अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन हे अघोरी प्रकार बंद करण्यासाठी प्रत्येकाने जागृत होण्याची गरज आहे.- डॉ. दीपक केळकर , मानसोपचार तज्ज्ञ, अकोला.