शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी महाअधिवेशनाचे आज उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2015 03:17 IST

देशभरातील पदाधिकारी अकोल्यात दाखल, नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती.

अकोला : राज्यात पुरोगामी चळवळींचा आधारस्तंभ बनलेल्या मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी महाअधिवेशनाला गुरुवारी शानदार मिरवणुकीने प्रारंभ झाला. शुक्रवार, २५ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या महाअधिवेशनाचे रीतसर उद्घाटन होणार आहे. या महाअधिवेशनासाठी २३ राज्यातील पदाधिकारी गुरुवारी अकोल्यात दाखल झाले. पुढील तीन दिवस येथे विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर मराठा सेवा संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन होत आहे. यानिमित्त गुरुवारी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाअधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर राहतील. यावेळी युवराज छत्रपती संभाजी राजे, स्वागताध्यक्ष नगरविकास, न्याय, विधी व गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, महसूल मंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे, मराठा सेवा संघाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष कमलेश पाटील आदी मंचावर उपस्थित राहतील. मराठा सेवा संघाच्या सर्वच कक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. रुख्मा राऊत आरोग्य कक्षातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात येईल. महाअधिवेशनात दुपारच्या दुसर्‍या सत्रात ह्यसमाजकारण, राजकारण व उद्योगक्षेत्रात मराठा महिलांचे स्थान, सहभाग आणि उपायह्ण या विषयावर चर्चा होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीमाजी आमदार रेखाताई खेडेकर राहणार असून, यावेळी विविध विभागातील महिला उपस्थित राहतील. दुपारी ४ ते ७ या वेळेत होणार्‍या तिसर्‍या सत्रात चर्चासत्राचा विषय ह्यपरदेश व प्रशासकीय सेवा-संधीह्ण हा असून, अध्यक्षस्थानी राज्याच्या जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख राहतील. चौथ्या सत्रात दुपारी ७ ते १0 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमात ह्यसंगीत रजनीह्ण होणार आहे. यावेळी पंडित कल्याणजी गायकवाड, प्रख्यात गायक व संगीतकार, सहकलाकार कार्तिकी गायकवाड झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्प महाविजेती, रोहित राऊत झी टीव्ही सारेगमप फेम हिंदी महाविजेता, कौस्तुभ गायकवाड ई टीव्ही, गौरव महाराष्ट्राचा महाविजेता, कैवल्य गायकवाड लिटिल चॅम्प फेम बाल गायक, तुकाराम आत्माराम जाधव सुप्रसिद्ध बाल तबला वादक सहभाग घेणार आहेत.