शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

By admin | Updated: January 24, 2016 00:45 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. ही इमारत मेट्रोच्या

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. ही इमारत मेट्रोच्या २ आणि ७ चे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वापरण्यात येणार आहे.वांद्रे-कुर्ला संकुलातील जुन्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या या ९ मजली इमारतीमध्ये अद्ययावत प्रेक्षागृह, दोन सभागृह, दोन तळ घरे, दोन सर्विस फ्लोअर्स आणि सार्वजनिक घोषणा प्रणालीचा समावेश आहे. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘प्राधिकरणाची नवीन इमारत दिमाखदार असून, केवळ मुंबईतच नव्हे, तर एमएमआरडीए प्रदेशात अद्ययावत पायाभूत सुविधा उभारणाऱ्या संस्थेला साजेशी ही इमारत आहे. प्राधिकरणातर्फे राबविल्या जाणाऱ्या अनेक प्रकल्पांमध्ये जागतिक दर्जाच्या कंपन्यांची नजर असते. अशा प्रथितयश सरकारी यंत्रणेचे कार्यालय आणि इमारत अशीच सुरेख आणि प्रशस्त असायला हवी, असे त्यांनी नमूद केले. दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो-२ मार्ग आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ हे प्रकल्प प्राधिकरणाने हाती घेतले आहेत. या प्रकल्पासाठी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ही जागा त्यांच्यासाठी उपयोगी पडेल, असे प्राधिकरणाचे आयुक्त यू.पी.एस.मदान म्हणाले.‘आयकॉनिक’चे काम ९७ महिन्यांनंतर पूर्ण बीकेसी येथील एमएमआरडीएच्या ‘आयकॉनिक’ इमारत उभारण्यासाठी १०६ कोटींचा खर्च झाला आहे. ९७ महिन्यांनंतर इमारतीचे काम पूर्ण झाले असून, यासाठी अतिरिक्त १९ कोटी खर्च झाला आहे. या इमारतीचे काम ३१-१२-२0१२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु काम वेळेत पूर्ण न झाल्याने कामासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.