शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आनंदच्या हस्ते राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद््घाटन

By admin | Updated: January 6, 2016 03:53 IST

नागपूरच्या बुद्धिबळ वर्तुळात मंगळवारची सुवर्ण अक्षरात नोंद झाली. ‘चौसष्ट घराचा राजा’ अशी ओळख असलेला....

नागपूर : नागपूरच्या बुद्धिबळ वर्तुळात मंगळवारची सुवर्ण अक्षरात नोंद झाली. ‘चौसष्ट घराचा राजा’ अशी ओळख असलेला आणि पाचवेळा जगज्जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या विश्वनाथन आनंदच्या उपस्थितीने नागपूरचे बुद्धिबळ वर्तुळ पावन झाले. आनंदने राजापुढील प्यादे खेळून ‘एस.एस. इंटरनॅशनल’ पाचव्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे शैलीदार उद््घाटन केले. क ळमना मार्गावरील नैवेद्यम इस्टोरिया सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील बुद्धिबळपटूंचा आदर्श असलेल्या आनंदला याची देही याची डोळा बघण्यासाठी बुद्धिबळपटूंनी गर्दी केली होती. उद््घाटन समारंभात बोलताना आनंदने गतस्मृतींना उजाळा दिला. ३० वर्षांपूर्वी सब-ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागपुरात आलो होतो, असे आनंद म्हणाला. बुद्धिबळ या खेळाचा विकास बघण्यासाठी नागपुरात पुन्हा येण्याची त्याने इच्छा जाहीर केली. यावेळी नागपूरच्या बुद्धिबळ विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणारे नागपूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्ही.के. त्रिवेदी यांचा आनंदच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विदर्भाचा पहिला ग्रॅण्डमास्टर स्वप्नील धोपाडे, महिला फिडे मास्टर दिव्या देशमुख, मृदुल डेहनकर आणि रौनक साधवाणी यांचा यावेळी आनंदच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आनंदने यावेळी सहभागी बुद्धिबळपटूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कृषी खात्याचे संचालक अतुल पाटणे, अतिरिक्त आयकर आयुक्त संजय दिवरे, नैवेद्यम समूहाचे राजू कामदार, आयोजन समिती सचिव दिलीप कामदार, एमसीएचे उपाध्यक्ष ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे, आयोजन समितीचे अध्यक्ष मनोज इटकेलवार, एनडीसीएचे अध्यक्ष व्ही.के. त्रिवेदी, सचिव के.के. बारट, एमसीएचे कमिश्नर गिरीश चितळे, स्पर्धेचे मुख्य आॅर्बिटर रतिनाम अनंथराम, एस.एस. इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ समीर धुमे आणि संचालक सुरेश चिचघरे आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांसाठी बुद्धिबळ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद््घाटन आनंद यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना आनंदने शाळेमध्ये बुद्धिबळ या खेळाच्या समावेशाचे महत्त्व विशद केले. ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांनी एमसीएसीआयएसतर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेसाठी बुद्धिबळ प्रशिक्षणाची योजना असल्याचे सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी).