शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

राजेंद्र दर्डा यांच्या डायनॅमिक संकेतस्थळाचे उद्घाटन

By admin | Updated: November 22, 2015 02:07 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या डायनॅमिक स्वरूपातील rajendradarda.com या संकेतस्थळाचे उद्घाटन आज त्यांच्या वाढदिवशी चाहत्यांच्या

औरंगाबाद : लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या डायनॅमिक स्वरूपातील rajendradarda.com या संकेतस्थळाचे उद्घाटन आज त्यांच्या वाढदिवशी चाहत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राजेंद्र दर्डा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह त्यांच्या चाहत्यांची लोकमत भवनात रीघ लागली होती. या चाहत्यांच्या गराड्यात माऊसद्वारे क्लिक करून राजेंद्र दर्डा यांनी या आधुनिक संकेतस्थळाचे उद्घाटन केले.शुभेच्छा द्यायला आलेल्या प्रत्येकाचे सुहास्य वदनाने स्वागत करणे, त्यांच्या पाठीवर हात ठेवून आस्थेवाईकपणे चौकशी करणे व त्यांच्याबरोबर छायाचित्र काढणे, हास्य विनोदात डुंबून जाणे ही राजेंद्र दर्डा यांची आजची खास वैशिष्ट्ये ठरली. सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत त्यांना शुभेच्छा द्यायला येणाऱ्यांची अक्षरश: रांग लागलेली होती. आठवण ठेवून शुभेच्छा द्यायला आल्याबद्दल धन्यवाद द्यायलाही राजेंद्र दर्डा विसरत नव्हते. राजकीय, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक, बँकिंग, पोलीस खाते, वैद्यकीय, वकील, पत्रकारिता अशा सर्व क्षेत्रातून शुभेच्छा द्यायला मंडळी आली होती. हे प्रेम पाहून राजेंद्र दर्डा हे हरखून गेले होते व आज मी फार खुश आहे, खूप आनंदी आहे, असे उद्गार त्यांनी काढले. दुसरीकडे मोबाईलवरूनही मुंबई, दिल्ली व अन्य ठिकाणांहून मान्यवरांच्या शुभेच्छा त्यांना मिळत होत्या. उपस्थित मान्यवर व चाहत्यांशी हितगुज करताना राजेंद्र दर्डा यांनी या संकेतस्थळाविषयीची भूमिका विशद केली. सन २००० मध्ये त्यावेळच्या तंत्रज्ञानासह हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. त्यानंतर सर्वसामान्यांशी थेट आदान-प्रदान करणाऱ्या फीचरसह २०१२ मध्ये हे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले. आता माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे संकेतस्थळ पाहण्याचे माध्यमही बदलले आहे. त्यामुळे डेस्कटॉपसह स्मार्टफोन व टॅब्लेटवर सहज पाहता येईल अशा फीचर व आकर्षक डिझाईनसह डायनॅमिक स्वरूपात हे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे. राजेंद्र दर्डा म्हणाले की, माझ्या आयुष्यातील सर्व महत्त्वाचे क्षण, प्रसंग, स्मृती व विविध क्षेत्रातील कामगिरी भविष्यात अभ्यासकांना विश्वासार्ह संदर्भ म्हणून निश्चितपणे उपयोगी ठरू शकेल, असा लेखाजोखा या अत्याधुनिक संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण व चित्रे या संकेतस्थळावर मी शेअर केली आहेत. यवतमाळातील बालपण, १९७४ मध्ये परदेशातून परतल्यावर नागपूर, जळगाव व औरंगाबादेतील वास्तव्य, बातमीदारीपासून तर संपादक म्हणून अग्रलेखांपर्यंतची दीर्घकाळ केलेली सक्रिय पत्रकारिता, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, आंतरराष्ट्रीय नेत्यांसमवेत पत्रकार म्हणून केलेल्या दौऱ्यांचे वार्तांकन, लेख, मुलाखती, छायाचित्रे, विविध दैनिकांत व पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे, मिळालेले सन्मान, भाषणांचे व्हिडिओ, झुंबर, व्हायब्रंट न्हिनगेट व आमचे विद्यापीठ ही पुस्तके, राजकारणातील प्रवेश, उत्कृष्ट संसदपटू, आमदार, राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री म्हणून केलेले दीड दशकातील काम, देशातील सर्व राज्यांच्या मंत्र्यांच्या कार्यगटाचे नेतृत्व, विविध देशातील शिष्टमंडळांशी चर्चा, उद्योग व शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय आदींचा आढावा लेख, बातम्या व छायाचित्रांच्या माध्यमातून rajendradarda.com या संकेतस्थळावर घेण्यात आला आहे.या संकेतस्थळावर आकर्षक होमपेज, प्रोफाईल, अ‍ॅचिव्हमेंटस्, भाषणे, आर्टिकल्स, फोटो गॅलरी, व्हिडिओ, न्यूज व अपडेटस् आणि फीडबॅक असे भाग करण्यात आले आहेत. या संकेतस्थळाची निर्मिती करण्यासाठी संदेशाचे राजेंद्र इथापे, अनिल जैन, लोकमतमधील आयटी, संपादकीय आणि संशोधन व संदर्भ चमू यांचे सहकार्य लाभले.