शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव

By admin | Updated: June 28, 2017 01:53 IST

काँग्रेस आघाडी सरकारने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची ५२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मग केवळ राज्यातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी कशी?

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : काँग्रेस आघाडी सरकारने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची ५२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मग केवळ राज्यातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी कशी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांसह इतर वर्गाची दिशाभूल करत असून या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. राज्य सरकार कर्जमाफीच्या आकड्याचा खेळ करत आहे. ९० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाल्याचा भुलभुलय्या सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या आकडेवारीचा हिशेबच लागत नाही. चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होऊन ४५ लाख नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ होणार असून आतापर्यंतच्या कर्जमाफीपेक्षा सर्वांत मोठी कर्जमाफी केल्याचा दावा सरकार करत आहे. कॉँग्रेस आघाडी सरकारने २००८ ला संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. त्यामध्ये तर २०-२० लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. किती शेतकऱ्यांना नेमका कर्जमाफीचा लाभ झाला, असा प्रश्न संसदेत केल्यानंतर तत्कालीन अर्थमंत्र्यांनी ५२ हजार कोटीरुपयांचा लाभ झाल्याचे सांगितले होते. मग ३४ हजार कोटींचे कर्जमाफ कसे केले, असा सवालही शेट्टी यांनी केला. सदाभाऊंवरील कारवाईचा आज फैसला-स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूखमैदान तोफ, माजी प्रदेशाध्यक्ष व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाईचा आज, बुधवारी फैसला होणार आहे. ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे कार्यकारिणीची बैठक होत आहे. यामध्ये ६ जुलैपासून मध्य प्रदेश येथून निघणाऱ्या देशव्यापी जागृती यात्रेच्या नियोजनावर चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांच्याबाबत जोरदार चर्चा होणार आहे. खोत यांच्यावर कारवाई करायची की त्यांना संघटनेत ठेवून त्यांची कोंडी करायची याबाबत संघटनेंतर्गत जोरदार चर्चा सुरू आहे.