शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 06:03 IST

प्रलंबित अर्जांबाबत प्रश्न उद्भवल्यास संबंधित विद्यापीठांचे कुलसचिव, महाविद्यालयांचे प्राचार्य जबाबदार राहतील, असेही स्पष्ट केले आहे.

मुंबई : उच्च शिक्षणातील शिष्यवृत्तीच्या थेट लाभ हस्तांतरणासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर गेल्या तीन वर्षांपासूनचे अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या  प्रलंबित अर्जांची तातडीने पडताळणी करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. प्रलंबित अर्जांबाबत प्रश्न उद्भवल्यास संबंधित विद्यापीठांचे कुलसचिव, महाविद्यालयांचे प्राचार्य जबाबदार राहतील, असेही स्पष्ट केले आहे.

याबाबत पुणे विद्यापीठ, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र, एसएनडीटी, डेक्कन कॉलेज अभिमत, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत. महाविद्यालय स्तरावर २०२० पासून आतापर्यंत चार वर्षांत अनुक्रमे ९१, ११६, १८४, ५३९ अर्ज प्रलंबित आहेत. तर, दुसऱ्या हप्त्यासाठी हेच आकडे अनुक्रमे ५०१, ५०२, ८५६, २ हजार २४०  असे नोंदवण्यात आले आहे.

अर्ज पडताळणीनंतरच शिष्यवृत्ती‘महाडीबीटी’वर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांबाबत रोजच्या रोज कार्यवाही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचा लाभ देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जांची महाविद्यालय स्तरावरून पडताळणी करणे गरजेचे आहे. महाडीबीटी संकेतस्थळ, राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळावरील प्रलंबित अर्जांची पडताळणी झाल्यानंतर शिष्यवृत्ती जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर एकाही विद्यार्थ्याचा अर्ज प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती