शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

साखरपुडा आटोपला अन् काही दिवसांतच भावी जावई मुलीला घेऊन फुर्रर

By नितिन गव्हाळे | Updated: April 5, 2023 18:07 IST

अकोट फैल भागात राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीचा साखरपुडा अमरावती येथील एका युवकासोबत झाला.

अकोला - जानेवारी महिन्यात मुलीचा साखरपुडा आटोपला. परंतु मुलीचे वय १७ वर्ष ६ महिने असल्याने, कुटूंबियांनी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांचा विवाह निश्चित केला. परंतु भावी जावयाने त्यापूर्वीच मुलीला काही कारणास्तव फूस लावून पळवून नेले. याप्रकरणात अकोट फैल पोलिसांनी भावी जावयाविरूद्ध गुन्हा दाखल केला. 

अकोट फैल भागात राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीचा साखरपुडा अमरावती येथील एका युवकासोबत झाला. परंतु मुलीचे वय कमी असल्याने, त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये लग्न ठरविले. मुलीसोबत भावी जावयाचे फोनवर नियमित बोलणे व्हायचे. दरम्यान मुलीला बरे वाटत नसल्याने, अमरावती येथील भावी जावई २५ मार्च रोजी मुलीला भेटण्यासाठी घरी आला. जावई म्हणून सासुनेही आदरातिथ्य केले. सासुला काही काम असल्यामुळे ती बाहेर निघुन गेले. घरी परतल्यावर भावी जावई आणि मुलगी दिसून आली नाही. दोघेही बाहेर गेले असतील. असा अंदाज तक्रारदार महिलेने बांधला. परंतु रात्री उशिरापर्यंत दोघेही परतले नाही.

मुलीचा साखरपुडा झालेला असल्यामुळे या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली नाही. परंतु मुलगी व भावी जावई न परतल्याने, महिलेने अमरावती येथील त्यांच्या घरीसुद्धा चौकशी केली. याठिकाणीही दोघे आढळून आले नाही. अखेर महिलेने अकोट फैल पोलिस ठाण्यात भावी जावायाविरूद्ध तक्रार दाखल केला.