शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

इम्रान कलावंत याला तेरा वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: September 9, 2015 00:02 IST

५० हजार रुपयांचा दंड : इचलकरंजीतील लैंगिक अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा निकाल

इचलकरंजी : अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याची अश्लील चित्रफीत बनवून प्रसारित केल्याप्रकरणी इम्रान मौला कलावंत (वय ३४, रा. गावभाग, इचलकरंजी) याला सोमवारी दोषी धरून जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश असमर यांनी १३ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. लैंगिक अत्याचार व अश्लील चित्रफीत प्रसारित करणे अशा खटल्यात मोठी शिक्षा झालेली ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.खटल्याची पार्श्वभूमी अशी : २ जुलै २००८ रोजी शिक्षक असलेल्या इम्रान कलावंत याने शाळेतील आपल्या विद्यार्थिनीला प्रश्नपत्रिका व महत्त्वाच्या नोटस् देण्याचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. तत्पूर्वी, दीड वर्षापासून तो तिचे शोषण करीत होता. तसेच त्याच्या अश्लील चित्रफिती बनविल्या. त्या चित्रफिती इम्रानने त्याच्या एका अल्पवयीन मित्राला दिल्या. तेथून या चित्रफितींचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. यातील एक चित्रफीत त्या दिवशी पीडित मुलीच्या नातेवाइकांमधील एकाच्या मित्राकडे आली. तेथूनच या प्रकरणाचा उलगडा झाला. ही माहिती समजताच संतप्त जमावाने कलावंत याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या तोंडाला काळे फासून त्याची गाढवावरून धिंड काढली. याप्रकरणी इम्रान याच्यासह त्याचा अल्पवयीन मित्र व लॉजमालक हरीष देवाडिगा या तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला. दोषारोपपत्र दाखल झाल्यापासून येथील जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणाची तीन वर्षे इन कॅमेरा सुनावणी सुरू होती. या सुनावणीमध्ये न्यायालयानेप्रामुख्याने पीडित मुलगी, इम्रानचा मित्र, फॉरेन्सिक वैद्यकीय प्रयोगशाळेचे तज्ज्ञ यांच्यासह एकूण ३१ साक्षीदार तपासले. त्यानंतर सोमवारी अंतिम निकाल दिला. यामध्ये कलम ३७६ नुसार १३ वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंड, माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ प्रमाणे तीन वर्षे शिक्षा व ३० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक वर्ष शिक्षा अशी शिक्षा सुनावली. या शिक्षेमधून दंड स्वरुपात न्यायालयाकडे जमा होणारी ५० हजार रुपयांची रक्कम नुकसानभरपाई म्हणून संबंधित पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.सोमवारी झालेल्या निकालाच्या सुनावणीदरम्यान आपले म्हणणे मांडताना सरकारी वकील एस. बी. सावेकर यांनी, संबंधित प्रकरणातील नाते गुरू-शिष्य असे आहे. या नात्याला समाजात आदराचे स्थान आहे. त्यामुळे या प्रकरणाचा समाजात जाणारा संदेश, तसेच संबंधित पीडित मुलीचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य याचा गांभीर्याने विचार करून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी केली,तर आरोपीचे वकील मेहबूब बाणदार यांनी, आरोपीची घरची परिस्थिती बेताची असून, त्याच्यावर आई-वडील व एक अविवाहित बहीण अवलंबून असल्याने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.दरम्यान, या प्रकरणातील इम्रानचा मित्र अल्पवयीन असल्याने व लॉजमालक देवाडिगा याचा थेट संबंध नसल्याने दोघांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी ऐकण्यासाठी वकिलांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी व नागरिकांनी न्यायालयात गर्दी केली होती. (वार्ताहर)दीड वर्षे वेळोवेळी लैंगिक शोषणयाप्रकरणी पोलीस उपअधीक्षक मोहन माने व अश्विनी सानप यांनी केलेल्या तपासात इम्रान कलावंत हा शिक्षक असलेल्या शाळेत २००७-०८ साली पीडित मुलगी शिकत होती. त्यावेळी इम्रानने प्रश्नपत्रिका व नोटस् देण्याचे आमिष दाखवत दीड वर्षे वेळोवेळी तिला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्याच्या दोन मोठ्या व अन्य लहान चित्रफिती बनवून त्याने त्या प्रसारित केल्याचे निष्पन्न झाले होते.जप्त केलेले साहित्य नष्ट करण्याचे आदेशया प्रकरणाचा न्यायालयाने ९० पानी निकाल दिला आहे. त्यामध्ये या प्रकरणात जप्त करण्यात आलेले एक लॅपटॉप, दोन सीडी, तीन मोबाईल, एक हार्ड डिस्क यांसह अन्य वस्तू नष्ट करण्याचे आदेश दिले.आता फक्त सहा वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार २००८ साली या प्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. त्यावेळेपासून इम्रान तुरुंगात आहे. म्हणून त्याची ही सात वर्षे तेरा वर्षांच्या शिक्षेतून वजा करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याला फक्त आणखीन सहा वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे.