शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

‘येरवडा’ सुधारा!

By admin | Updated: October 16, 2015 03:31 IST

क्षमतेपेक्षा अधिक कैदी, अंडटरट्रायल्स कैदी, मुलभूत सुविधांचा अभाव, असे काहीसे चित्र येरवडा कारागृहाचे असल्याने गुरुवारी उच्च न्यायालायने या कारागृहाची स्थिती सुधारण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

मुंबई : क्षमतेपेक्षा अधिक कैदी, अंडटरट्रायल्स कैदी, मुलभूत सुविधांचा अभाव, असे काहीसे चित्र येरवडा कारागृहाचे असल्याने गुरुवारी उच्च न्यायालायने या कारागृहाची स्थिती सुधारण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. तसेच या धर्तीवर आर्थररोड व भायखळ््याच्या महिला कारागृहाची तपासणी करून चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना दिले आहेत.येरवड्यातील एका कैद्याने कारागृहाच्या वाईट स्थितीबद्दल उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने दोन आठवड्यांपूर्वी पुण्याच्या प्रधान न्यायाधीशांना कारागृहाच्या स्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सादर करण्यात आलेल्या अहवालाची दखल घेत खंडपीठाने राज्य सरकाला येरवड्याची ही वाईट दशा सुधारण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले. त्याशिवाय महिला कैद्यांबरोबर रहात असलेल्या त्यांच्या १६ मुलांच्या शिक्षणाची काय सोय केली आहे? अशी विचारणाही खंडपीठाने केली. तसेच कैदी किंवा अंडरट्रायल्स असलेल्या महिलांच्यामुलांविषयी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही कारागृह अधीक्षकांना देत २९ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले.येरवडाच्या धर्तीवर आर्थररोड व महिलांच्या भायखळा कारागृहाची पाहणी करण्याचे आदेश खंडपीठाने सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना दिले. >>> कारागृहाची क्षमता २३२३ इतकी असून या कारागृहात ८ आॅक्टोबरपर्यंत ३,८०० कैदी तर २,८८७ अंडरट्रायल्स कैदी आहेत. महिला कारागृहाची क्षमता १२५ असून ९९ कैदी तर २८ अंडरट्रायल्स आहेत. त्यांच्याबरोबर १६ मुलेही आहेत, असे पुण्याच्या प्रधान न्यायाधीशांनी अहवालात नमूद केले आहे. सुमारे ६,००० जणांसाठी अवघी ५२९ शौचालये आहेत. १२५ पेक्षा अधिक महिलांसाठी केवळ १९ शौचालये आणि दोन बाथरुम आहेत.