शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

... आहेत ती शहरे सुधारा

By admin | Updated: January 21, 2016 03:43 IST

शहरे सुधारण्यासाठी संवेदनशील, सुशिक्षित नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज आहे. शिवाय स्मार्ट सिटीचा हव्यास धरण्यापेक्षा आहेत

मुंबई : शहरे सुधारण्यासाठी संवेदनशील, सुशिक्षित नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज आहे. शिवाय स्मार्ट सिटीचा हव्यास धरण्यापेक्षा आहेत ती शहरे सुधारली तरच शहरे खऱ्या अर्थाने स्मार्ट होतील, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टी.आय.एस.एसमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय अधिवेशनात केले.देवनार येथील टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्समध्ये ‘रिथिंकीग सिटीज इन द साऊथ ग्लोबल’ या विषयावर आंतरराष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘शहर विकास’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शहरात मोठ्या प्रमाणावर होणारे खासगीकरण हे शहर विकासास हानीकारक आहे. त्यामुळे खासगीकरण ताबडतोब स्थगित करावे. तर प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवर खंत व्यक्त केली. एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी देशात अनेक विभागांची मंजूरी मिळवावी लागते. या लांबणाऱ्या प्रक्रियेत बदल करावा. तसेच शहरे विकसित करायची असतील तर शहरे बकाल करण्यास कारणीभूत असणाऱ्या ‘एसआरए’ प्रकल्पांवर वेसण घालावी, असे आंबेडकर म्हणाले. शिवाय भारतात निवडून आलेल्या महिलेला समान वागणूक दिली जात नाही. त्यासाठी महिलांनाही पुरुषांबरोबरीने स्थान देणारी व्यवस्था तयार व्हायला हवी, असे भारती शर्मा यांनी नमुद केले.आंतरराष्ट्रीय अधिवेशनात भारतातील शहरांसोबत जकार्ता, रिओ द जिनेरो, कराची, इस्तंबूल या शहरांच्या समस्या आणि उपाययोजना चर्चिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)