शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमर महल उड्डाणपुलाचा नादुरुस्त गाळा बदलविण्यात येणार

By admin | Updated: April 17, 2017 23:10 IST

पूर्व द्रुतगती मार्गावरील अमरमहल उड्डाण पुलाचा नादुरुस्त गाळा बदलविण्यात येणार

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 - पूर्व द्रुतगती मार्गावरील अमरमहल उड्डाण पुलाचा नादुरुस्त गाळा बदलविण्यात येणार असून येत्या चार महिन्यांत हा पुल वाहतुकीस पुर्ववत सुरु करण्यात येईल. तोपर्यंत होणाऱ्या गैरसोयीबद्दल जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.पूर्व द्रुतगती मार्गावरील अमरमहल उड्डाण पुलाच्या दुरुस्तीबाबत माहिती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री पाटील बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव पी. एल. बोंगीरवार उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले की, पूर्व द्रुतगती मार्गावरील अमरमहल उड्डाणपुलाचे गर्डरचे सांधे नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आले होते. या पुलाचे बांधकाम 22 वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. या पुलाची लांबी 267 मीटर असून त्या पैकी 61 मीटरचा गाळा बाधित झाला आहे. तूर्त या पुलावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, पुलाखालील वाहतूक अतिरिक्त गाळ्यातून सुरळीत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.या पुलाच्या सुरक्षिततेसाठी व भविष्यातील हानी टाळण्याच्या दृष्टीने तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी आयआयटी, पवई येथील प्रा. डॉ. रवी सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानुसार या पुलाचे नादुरुस्त झालेले गर्डर नव्याने बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्यात येऊन या पुलावरील वाहतूक पुर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.या पुलावरील अपेक्षित जड वाहतूकीपेक्षा सध्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुलाचा सांधा निखळण्याची शक्यता असल्याचे सांगून पाटील म्हणाले की, सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील इतर पुलांच्या सुरक्षिततेबाबत शासनाचे धोरण सर्व ब्रिटीशकालीन व धोकादायक वाटणाऱ्या पुलांच्या सर्वंकष तपासणीकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर, मुंबईतील पुलांवरील वाढीव अवजड वाहतुकीचा विचार करता पुलांची सर्वंकष तपासणी व सर्वेक्षण करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणावरील वाहतुकीत सुलभता आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून जनतेने होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करण्याचे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.निविदेप्रक्रियेसाठी नोंदणीकृत कंत्राटदार असण्याची अट रद्दत्याचबरोबर, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येणाऱ्या विविध कामांमध्ये निकोप स्पर्धा व्हावी व जास्तीत जास्त स्पर्धात्मक देकार मिळावेत यासाठी निविदा सादर करणारे कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पंजीकृत असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व कंत्राटदारांना पात्रता निकष पूर्ण करुन निविदेमध्ये सहभाग घेता येणार असल्याचा शासन निर्णय पारित करण्यात आला असल्याची माहिती ही पाटील यांनी यावेळी दिली.