शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जळत्या अगरबत्तीभोवती घेतलेले फेरेही सप्तपदीच, उच्च न्यायालयचा महत्त्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:55 IST

जळत्या अगरबत्तीभोवती सात फेरे घेतले नाहीत, याचा अर्थ हिंदू विवाह कायद्यानुसार, पवित्र अग्नीपुढे सप्तपदी केला नाही, असा होत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने पतीला पत्नीपासून घटस्फोट देण्यास नकार दिला.

मुंबई : जळत्या अगरबत्तीभोवती सात फेरे घेतले नाहीत, याचा अर्थ हिंदू विवाह कायद्यानुसार, पवित्र अग्नीपुढे सप्तपदी केला नाही, असा होत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने पतीला पत्नीपासून घटस्फोट देण्यास नकार दिला.मुंबईचे रहिवासी अमित अगरवाल (बदलेले नाव) यांनी त्यांची पत्नी कमला अगरवाल (बदलेले नाव) हिच्याशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याचे कारण देत, वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. मात्र, कुटुंब न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. या निर्णयाला अमित यांनी उच्च न्यायालयात अपील केले. यावरील सुनावणी न्या. के. के. तातेड व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे सोमवारी होती.अमित अगरवाल यांच्या म्हणण्यानुसार, एका वर्तमानपत्रामध्ये आलेल्या जाहिरातीद्वारे त्यांना कमलाचा प्रस्ताव आला. १५ जानेवारी २००९ रोजी त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर, लगेच १३ फेब्रुवारी २००९ रोजी विवाह ठरला. विवाहाच्या दिवशी दोन्ही पक्षांमध्ये वाद झाल्याने दोघांचा विवाह मोडला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी एका सामाजिक कार्यकर्तीचा फोन आला. तिने जवळच्या एका हनुमानाच्या मंदिरात बोलावले. मंदिरात न आल्यास त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदविण्याची धमकी दिली. त्यामुळे तो मंदिरात गेला. तिथे त्याचे जबरदस्तीने कमलाशी लग्न लावून दिले. मीडिया व फोटोग्राफर्सना तिथे उपस्थित करण्यात आले आणि जबरदस्तीने कागदांवर सह्या करून घेण्यात आल्या.‘हिंदू विवाह कायद्यानुसार, हवनाभोवती सात फेरे घेणे बंधनकारक आहे, परंतु आमची सप्तपदी पवित्र अग्नीभोवती झाली नाही. हा विवाह हिंदू कायद्यानुसार झालेला नाही. त्यामुळे हा विवाह रद्द करण्यात यावा,’ अशी विनंती अगरवाल यांनी न्यायालयाला केली.त्यावर कमलाने आक्षेप घेतला. त्याचे आरोप फेटाळताना तिने न्यायालयाला सांगितले की, हनुमानाच्या मंदिरात अमितने बोलावले. त्याच्याबरोबर पाच-सहा नातेवाईक होते व त्याची आईही होती. पुजाºयाने मंत्र म्हणून आम्ही पेटलेल्या अगरबत्त्यांंभोवती सात फेरे घेतले आहे. १४ फेब्रुवारी रोजी लग्न झाल्यावर, अमितने कमलाला त्याच्या घरी नेले. २८ एप्रिल २००९ पर्यंत तो तिच्याशी नीट वागत होता. या कालावधीतया दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले. मात्र, अचानक २९ एप्रिल रोजी अमितने तिला घटस्फोटाची नोटीस बजावली. घटस्फोट मागण्याचे कारणही सांगितले नाही.