शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगण्यासाठी बांबुच्या सायकलने प्रवास

By admin | Updated: August 13, 2016 20:18 IST

मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगण्यासाठी पनवेलच्या प्रिसीलिया मदन व सुमित पारिंगेने कन्याकुमारी ते खारदूंग हा प्रवास चक्क बांबुच्या सायकलने सुरु केला आहे

- ऑनलाइन लोकमत
कामरगाव (वाशिम), दि. 13 - मुलींच्या शिक्षणाची चळवळ व्यापक व्हावी यासाठी जनजागृतीचे अनेक उपक्रम राबविले जातात मात्र पनवेलच्या प्रिसीलिया मदन व सुमित पारिंगेने कन्याकुमारी ते खारदूंग हा प्रवास चक्क बांबुच्या सायकलने सुरु केला आहे. सद्या त्यांचा प्रवास वाशिम जिल्हयातून होत आहे.
 
११ जुलैला त्यांनी मुंबई ते कन्याकुमारी हा  प्रवास विमानाने केला त्यानंतर त्यांनी १४ जुलैला प्रत्यक्ष या सायकलप्रवासात सुरुवात केली. या प्रवासासाठी त्यांना एका कंपनीने प्रायोजकत्व दिले असून वजनाला हलक्या व चालवायला सोप्या अशा बांबु फ्रेमच्या सायकली उपलब्ध करुन दिल्या.  सोबत आशिष तारु हे बांबुप्रेम टेक्नीशियन व  मदतीकरिता सचिन जाधव या मोहीमेत सहभागी आहेत. सुमित पारींगे हे इंजिनिअर असून प्रिसीलिया ही ए.एस.सी कॉम्प्युटर झालेली आहे. या आधी प्रिसीलीयाने एकट्यानेच पनवेल ते कन्याकुमारी  , पनवेल खारदुंग ,ओडीया, मनाली, खारदुंग हजारो कि.मी.चा प्रवास सायकलने केला आहे.
सुमित पारिंगे यांनी या आधी पनवेल ते सियाचीन ह्या खडतर प्रवासासह अनेक ठिकाणी हजारो कि़मी.प्रवास केला आहे. सध्या त्यांचा  प्रवास वाशिम जिल्ह्यातून सुरु असून १८०० कि़मी.पल्ला त्यांनी गाठला आहे.या प्रवासादरम्यान  त्यांनी ‘बेटी पढाओ मोहीमें’तर्गत ५०  लाखांचा निधी गोळा करण्याचे त्यांचे लक्ष आहे. हा निधी फ्युएलड्रीम ही कंपनी आॅनलाईन गोळा करणार आहेत आणि हा निधी दिल्लीमधील  शाळामध्ये शिकणाºया मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाºया इम्पॅक्ट या स्वयंसेवी संस्थेला तो दिला जाणार आहे हे विशेष. अवघ्या २२ वर्षीय तरुणाचे हे धाडस पाहून अनेकांना तीच कौतुक वाढते. सध्या गावकरी, प्रवासी व विद्यार्थ्यांना त्यांच्या बांबुच्या सायकली हा औत्सुकयाचा विषय ठरत आहे.