शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी

By admin | Updated: July 20, 2014 01:12 IST

बहुतांश अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्णत्वास येत असल्याने यंदा विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळेल की नाही याबद्दल निरनिराळे कयास लावण्यात येत होते. परंतु अखेर यावर पडदा पडला आहे.

‘डीटीई’चे निर्देश : अभियांत्रिकी, फार्मसीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांना फायदानागपूर : बहुतांश अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्णत्वास येत असल्याने यंदा विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळेल की नाही याबद्दल निरनिराळे कयास लावण्यात येत होते. परंतु अखेर यावर पडदा पडला आहे. ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशादरम्यान मराठा समाजातील विद्यार्थ्यांना १६ टक्के आरक्षण तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहे. परंतु अभियांत्रिकीसमवेत इतर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आरक्षण लागू करणे शक्य होणार नाही, अशी माहिती ‘डीटीई’च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तयार करून त्या प्रवर्गांतर्गत मराठा समाजाचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयाला अनुसरून २०१४-१५वर्षापासून अभियांत्रिकी व फार्मसीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू करण्याचे निर्देश ‘डीटीई’ने दिले आहेत. आरक्षणांतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी अर्ज करताना जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे असे अधिसूनचेत स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)थेट द्वितीय वर्ष प्रवेशप्रक्रिया सुरू‘डीटीई’तर्फे अभियांत्रिकी व फार्मसीच्या अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना २८ जुलैपर्यंत ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कागदपत्रांची पडताळणी २९ जुलैपर्यंत करण्यात येईल. ३० जुलै रोजी तात्पुरती गुणवत्तायादी जाहीर करण्यात येईल. तर ३ आॅगस्टला ‘डीटीई’च्या संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.