शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मातृत्व अनुदान योजना राबविणार

By admin | Updated: June 13, 2017 01:21 IST

केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाची घोषणा केली आहे. ही योजना राज्यात राबविण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाची घोषणा केली आहे. ही योजना राज्यात राबविण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात ग्रामविकास आणि महिला व बालविकास विभागाच्या वित्त व नियोजन विभागाकडे असलेल्या प्रलंबित विषयांवर आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मातृत्व अनुदान योजनेत ज्या गर्भवती महिला कोणत्याही कारणांमुळे आपली प्रसुतीपूर्व तपासणी करू शकलेल्या नाहीत. त्यांना अशा प्रकारच्या तपासण्या करण्याच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करून देणे, कुपोषणग्रस्त महिलांच्या बाबतीत त्यांच्या आजारांचे लवकर निदान होण्याच्या दृष्टीने योग्य व उचित व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देणे, किशोरवयीन व लवकर गर्भधारणा होणाऱ्या मुलींच्या बाबतीत त्यांना विशेष देखभालीची आवश्यकता असल्याने त्यांच्या गर्भधारणेच्या कालावधीमध्ये विशेष लक्ष देणे, गर्भधारणेच्या कालावधीत उद्भवणारा रक्तदाब, मधुमेह, अशक्तपणा आदी आजारांचे नियमित चाचण्या व तपासण्या करून उचित व्यवस्थापन करण्यात येणार आहे.अंगणवाडी सेविकांचे मानधन जुलैपासून बँक खात्यातअंगणवाडी सेविकांचे मानधन वेळेत व नियमित मिळण्यासाठी तसेच बँक खात्यात थेट जमा करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ जुलैपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मानधन थेट बँकेत जमा होणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. सोमवारी झालेल्या बैठकीत वित्त व नियोजन विभागाकडे प्रलंबित असलेल्या माझी कन्या भाग्यश्री, स्मार्ट अंगणवाडी, सुधारित मनोर्धैर्य योजना आदी योजना तसेच ग्राम विकास विभागाच्या विविध योजना तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.