शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अमर साबळेंच्या पुतळ्यांचे दहन

By admin | Updated: May 14, 2017 00:52 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका स्वीकृत सदस्य निवडीवरून भारतीय जनता पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी पिंपरीतील मोरवाडीतील भाजपा कार्यालयात राडा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्वीकृत सदस्य निवडीवरून भारतीय जनता पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी पिंपरीतील मोरवाडीतील भाजपा कार्यालयात राडा केला. पक्षविरोधी काम करणाऱ्यांना स्वीकृतची बक्षिसी दिल्याबद्दल खासदार अमर साबळे आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड़ सचिन पटवर्धन यांच्या पुतळ्यांचे दहन केले. पुण्याप्रमाणेच पिंपरीतील भाजपात गटबाजीचे राजकारण सुरू झाले असून, खासदार साबळे आणि अ‍ॅड. पटवर्धन यांच्या विरोधात भाजपाच्या नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांनी बंड केले आहे.स्वीकृतचे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपाकडून नावांची घोषणा होत नव्हती. त्यामुळे पक्षनेते एकनाथ पवार आणि पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दाणवे यांच्या आदेशाची वाट पाहत होते. दोनवेळा मुदतवाढ घेतल्यानंतर पाच तासांनंतर मुख्यमंत्र्यांचा एसएमएसवरून भाजयुमोचे मोरेश्वर शेडगे, माउली थोरात, बाबू नायर यांची नावे पाठविली. त्यावर खासदार साबळे समर्थक थोरात, पटवर्धन समर्थक नायर यांच्या निवडीबद्दल भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. बैठक सुरू असतानाच काही कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर आले. मिथुन मथुरे, नीलेश अष्टेकर यांनी साबळे आणि पटवर्धनांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पुतळ्यांचे दहन केले. तसेच कार्यालयातील दोघांच्या छायाचित्राला काळे फासले. अचानक घडललेल्या प्रकाराने सर्वांची तारांबळ उडाली होती. भाजपा नेतृत्वाने घेतलेला निर्णय शिरोधैर्य मानण्याची परंपरा पक्षात आहे. संस्कारित परंपरेला काळिमा फासण्याचे काम केले आहे. गैरप्रकार असून भ्याड हल्ला आहे. भाजपा विचारधारा, संस्कृतीशी अनभिज्ञ असणाऱ्या लोकांचे गैरकृत्य निषेधार्ह आहे. स्वीकृत सदस्य निवडीचाही निर्णय मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्षांनी एकमताने घेतला होता. नेतृत्वाविरोधातील गैरप्रकाराची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे.-अमर साबळे (खासदार)स्वीकृत सदस्यपद निवडीबाबत पक्षश्रेष्ठींकडून सूचना आल्यानंतर, आम्ही आयुक्तांना नावे दिली. त्या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. पक्ष कार्यालयात आजही काही कार्यकर्ते आले होते. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पक्षाची बदनामी होईल, प्रतिष्ठेला बाधा येईल, याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यायला हवी. भाजपाला विचारधारा आहे. आपल्या भावना पक्षश्रेष्ठींकडे पोहोचविल्या जातील.- एकनाथ पवार, पक्षनेते कलेक्शन करणाऱ्यास संधी कशी?महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या आणि नेत्यांचे कलेक्शन करणाऱ्या थोरात यांना स्वीकृतची बक्षीसी दिली. तसेच दीड वर्षांपूर्वी पक्षात दाखल झालेल्या नायर यांना कोणत्या निकषाने संधी दिली. केवळ नेत्यांमागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्षाने ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे.>पिंपरी-चिंचवड महापालिका स्वीकृत सदस्य निवडीवरून पुण्याप्रमाणे पिंपरीतही कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त झाला. खासदार अमर साबळे आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड़ सचिन पटवर्धन यांच्या पुतळ्यांचे भाजपामधील नाराज कार्यकर्त्यांनी शनिवारी दहन केले.