शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलवर लावलेला अधिभार तात्काळ मागे घ्या - खा. अशोक चव्हाण

By admin | Updated: April 24, 2017 19:18 IST

राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलवर प्रति लिटर तीन रूपये अधिभार लावल्याने पेट्रोल भाव वाढले आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 24 -  राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलवर प्रति लिटर तीन रूपये अधिभार लावल्याने पेट्रोल भाव वाढले आहेत. या भाववाढीमुळे अगोदरच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे सरकारने पेट्रोलवर लावलेला वाढीव अधिभार तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
 
पेट्रोलवर अधिभार लावण्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना खा. चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारला कुठलीही आर्थिक शिस्त राहिली नसून राज्य सरकार आर्थिक आघाडीवर अपयशी ठरले आहे. या सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे राज्याच्या महसूलात मोठी घट झाली आहे. देशाच्या महालेखापालांनीही आपल्या अहवालात असेच मत व्यक्त केले आहे. स्वतःच्या नियोजनशून्य कारभारामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अधिभार वाढवून जनतेची लूट सुरु आहे. रात्रीच्या अंधारात जनतेला लुबाडणारेच काम करित असतात. राज्य सरकारनेही रात्री गुपचुप ही वाढ करून दुर्देवाने हेच दर्शवून दिले आहे. काँग्रेस पक्ष याचा तीव्र निषेध करित असून सरकारने हा अधिभार तात्काळ मागे घ्यावा, ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे असे खा. चव्हाण म्हणाले.
 
महामार्गालगत 500 मीटर अंतरावरील दारू दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने सरकारच्या उत्पन्नात घट होणार आहे.  त्याची भरपाई करण्यासाठी सरकारने पेट्रोलवर अधिभार लावला आहे. मात्र महामार्गालगतच्या दारूबंदीमुळे बुडणारा महसूल भरून काढण्यासाठी सर्वसामान्यांना भुर्दंड का ? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरकारला केला आहे.