शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर 'आजी'ची सायकलने देशभ्रमंती

By admin | Updated: July 24, 2016 20:40 IST

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर येथील ६७ वर्षीय वृद्धेने २४ जुलैपासून सायकलद्वारे देशभ्रमंतीला सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमतखामगाव, दि. 24 - म्हातारवयात इतरांनी संगोपन करावे, अशी वेळ व अपेक्षा असताना सुद्धा दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर येथील ६७ वर्षीय वृद्धेने २४ जुलैपासून सायकलद्वारे देशभ्रमंतीला सुरुवात केली आहे. शहरातील नाथ प्लॉट परिसरात राहणाऱ्या रेखा देहभानकर या सन २००७मध्ये पंचायत समिती शेगाव येथून केंद्रप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या. मात्र सेवानिवृत्तीनंतरही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. समर्थ रामदास स्वामींच्या 'केल्याने देशाटन, येत असे चातुर्य' या उक्तीपासून बोध घेत त्यांनी सायकलने देशभ्रमंतीचा निर्णय घेतला. अशा वारीतूनच विविध मनोवृत्तींचा अभ्यास, निसर्गाची ओळख, विचारांची देवाण-घेवाण होते व समर्थ रामदासांच्या उक्तीचा परिचय होता. ज्ञान हे पुस्तकांपेक्षा अनुभवांचे मोठे असते, अशा विचारसरणीतून असे मत रेखा देवभानकर यांनी व्यक्त केले.

खामगाव ते शेगाव शेकडो पायीवारी त्यांनी केल्या आहेत. नोकरीत असताना १९९५ ते २००४ दरम्यान देऊळगाव राजा ते शेगाव अशी १४० किलोमीटरच्या सात पायी वारी पूर्ण केल्या. पायीवारीचा निश्चय पूर्ण केल्याच्या अनुभवातून त्यांनी शेगाव ते आळंदी सायकलवारीचा निश्चय केला व ही वारी पूर्णत्वास नेली. पंढरपूर, तुळजापूर, श्रीक्षेत्र गोंदवले, शनिशिंगणापूर, अक्कलकोट, अंबेजोगाई, परळी या व इतर ठिकाणी त्यांनी सायकलवारीने भेट दिली. त्यानंतर सन २०१२ ते २०१४ अशी दोन वर्षे खडतर अशी सुमारे ४ हजार किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. त्यानंतर सन २०१५ मध्ये वैष्णोदेवी यात्रा सायकलने पूर्ण करण्याचा संकल्प करीत ही वारी सुध्दा पूर्ण केली. यातून मनोबल उंचावल्याने त्यांनी यावर्षीही पाच राज्यातून होत वैष्णोदेवीपर्यंतची यात्रा सायकलने सुरु केली आहे.

वैष्णोदेवी यात्रेनंतर कलने सुरु केली आहे. वैष्णोदेवी यात्रेनंतर दुसऱ्या टप्प्यात इतर राज्यातील यात्रा सुध्दा सायकलने पूर्ण करण्याचा संकल्प रेखाताई देहभानकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या यात्रा शुभारंभप्रसंगी परिसरातील नागरिकांनी त्यांचा पुष्पहाराने सत्कार केला.