शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

आलिशान मोटारींतून अवैध वाहतूक

By admin | Updated: August 4, 2016 01:29 IST

कासारवाडी येथील नाशिक फाटा येथून पुणे-नाशिक मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीचा धंदा जोरात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

पिंपरी : कासारवाडी येथील नाशिक फाटा येथून पुणे-नाशिक मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीचा धंदा जोरात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील अवैध वाहतुकीचा मुद्दा गाजत असताना आता पुणे-नाशिक महामार्गालाही अवैध वाहतुकीचे ग्रहण लागले आहे. हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलिसांचे कार्यालय असताना अवैध वाहतूक होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वेगवेगळ्या कंपनीच्या आलिशान मोटारी, जीप तसेच खासगी बसगाड्यांमधून ही वाहतूक केली जात आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या बसला पुणे ते नाशिक प्रवासासाठी २२७ रुपये तिकीट आहे. आलिशान गाड्यांचे कारण देत प्रवाशांकडून ३०० रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. काही वाहनचालकांकडून जास्तीत जास्त प्रवासी मिळवण्यासाठी एसटी बसपेक्षा कमी पैशांमध्ये प्रवासी वाहतूक केली जाते. या अवैध वाहतुकीसाठी केवळ पुण्यातीलच गाड्या वापरल्या जात नाहीत, तर एमएच १५ पासिंग असणारी नाशिकमधील वाहने वापरली जातात. या अवैध वाहतुकीत कमिशनवर काम करणारी टोळी सक्रिय आहे. यातील लोक वाहनचालकांना प्रवासी मिळवून देतात. एका प्रवाशामागे ३० ते ५० रुपये या लोकांना मिळतात. त्यामुळे सकाळपासूनच हे लोक प्रवासी मिळवण्यासाठी बसथांब्यावर गर्दी करतात. नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी रुंदीकरणाची कामे चालू आहेत. शिवाय, काही ठिकाणी एकपदरी रस्ता आहे. त्यामुळे विशिष्ट वेगमर्यादेतच वाहन चालविणे गरजेचे आहे. परंतु, ज्या गाड्यांमधून ही अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. त्या वाहनांच्या चालकांकडून कोणत्याही वेगमर्यादेचे पालन केले जात नाही. त्यामुळे भीषण अपघात होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)