शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

समांतर रस्त्यालगत बेकायदा टपऱ्या

By admin | Updated: June 9, 2016 04:26 IST

कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यालगत बेकायदा टपऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा व जवळचा रस्ता असलेल्या कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यालगत बेकायदा टपऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. एकीकडे स्मार्ट सिटीचे स्वप्न बघितले जात असताना दुसरीकडे समांतर रस्त्यावर होत असलेल्या विद्रुपीकरणाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. तातडीने या टपऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा महासभेत याबाबत आवाज उठवावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक व माजी विरोधीपक्षनेते विश्वनाथ राणे यांनी प्रशासनाला दिला आहे.कल्याण-डोंबिवलीत ये-जा करणारे सध्या समांतर रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. कल्याण-शीळ मार्गावरची वाहतूककोंडी, इंधनाचा होणारा अपव्यय पाहता केडीएमसीने काही वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली समांतर रस्ता प्रस्तावित केला होता. या रस्त्याचे महापालिका हद्दीतील जवळपास ९५ टक्के काम पूर्णही झाले आहे. परंतु, रेल्वेच्या हद्दीतून सुमारे २०० मीटर जागेतून हा रस्ता जात असल्याने रेल्वे प्रशासनाच्या परवानगीची आवश्यकता होती. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला असता त्यांनी रस्त्याच्या बदल्यात २४ कोटी रुपयांची मागणी केडीएमसीकडे केली होती. त्यावर, केडीएमसीने कांचनगावातील जागा देण्याचा प्रस्ताव दिला. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले होते. परंतु, महापालिकेने दिलेली जागा रेल्वेने नुकतीच स्वीकारल्याने समांतर रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या महत्त्वाच्या रस्त्यालगत बेकायदा टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. मटणविक्रीची दुकाने, पानटपऱ्या, वेल्डिंगची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहेत. त्याकडे राणे यांनी लक्ष वेधले आहे. आतापर्यंत या रस्त्यावर ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. याच मार्गावर सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नुकतीच या मार्गाला भेट देऊन पाहणी केली होती. राष्ट्रीय रस्ते मानांकनाप्रमाणे या मार्गाच्या दोन्ही बाजूंना मिळून आठ फुटी पदपथ ठेवण्यात आला आहे. नागरिकांना याचा जॉगिंग ट्रॅक म्हणून वापर करण्याच्या अनुषंगाने कंत्राटदाराला वाढीव कामही देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>जुन्या रस्त्यावरही अतिक्रमणे कायमसमांतर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असताना लगतच्या टपऱ्यांकडे केडीएमसीचे होत असलेले दुर्लक्ष चुकीचे आहे. जुन्या रस्त्यांवरील फेरीवाल्यांची अतिक्रमणे हटवण्यात प्रशासन पुरते अपयशी ठरले आहे. त्यात आता समांतर रस्त्यावरील टपऱ्यांची अतिक्रमणे न रोखल्यास नागरिक माफ करणार नाहीत, असे पत्र विश्वनाथ राणे यांनी आयुक्त ई. रवींद्रन व महापौर राजेंद्र देवळेकर यांना दिले आहे.