शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवैध बांधकामप्रश्नी नवी मुंबई पालिकेची सरकारविरोधात धाडसी भूमिका

By admin | Updated: March 9, 2017 04:35 IST

बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध राज्यातील कोणतीच महापालिका व सरकारी संस्था काहीही बोलत नसताना नवी मुंबई महापालिकेने

मुंबई : बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध राज्यातील कोणतीच महापालिका व सरकारी संस्था काहीही बोलत नसताना नवी मुंबई महापालिकेने धाडसी भूमिका घेत सरकारचे हे धोरण आपल्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बसत नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगत अप्रत्यक्षरीत्या सरकारच्या निर्णयापासून फारकत घेतली. महापालिकेच्या या भूमिकेमुळे महाअधिवक्ता रोहित देव हे आश्चर्यचकित झाले. राज्य सरकारचे धोरण प्रस्तावित असताना नवी मुंबईत ३०० बेकायदा बांधकामे नव्याने उभी राहिली. आम्हाला बेकायदा बांधकामांना आळा घालायचा आहे. तसेच अशा पद्धतीने बेकायदा बांधकामे नियमित करण्याची तरतूद आमच्या ‘डीसीआर’मध्ये नाही, असे नवी मुंबई महापालिकेतर्फे अ‍ॅड. संदीप मारणे यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. त्यांच्या या भूमिकेवर खुद्द महाअधिवक्ते आश्चर्यचकित झाले. त्यामुळे त्यांनी आयुक्तांविरुद्ध महासभेत अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर सरकारनेच त्यांना पाठीशी घातल्याची आठवण मारणे यांना करून दिली. मात्र अ‍ॅड. मारणे यांनी ही सूचना आयुक्तांकडूनच आल्याने आपण या भूमिकेवर ठाम आहोत, असे खंडपीठाला सांगितले. ‘नक्की कोणाकडून सूचना घेतल्यात?’ असे महाअधिवक्त्यांनीच मारणे यांना विचारले. ‘उपायुक्तांना आयुक्तांकडून सूचना आल्या आहेत आणि त्याच सूचना मला देण्यात येत आहेत,’ असे मारणे यांनी देव व न्यायालयाला सांगितले.‘सरकारने आयुक्तांना पाठीशी घातले, याचा अर्थ त्यांनी सरकारविरुद्ध कोणताही जनहितार्थ निर्णय घ्यायचा नाही का,’ असा सवाल न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने सरकारला केला. त्यावर देव यांनी मौन बाळगले. (प्रतिनिधी)निकाल ठेवला राखूनराज्यातील ३१ डिसेंबर २०१५पर्यंतची सर्व बेकायदा बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या प्रस्तावित धोरणावर उच्च न्यायालयाने बुधवारी निकाल राखून ठेवला.