शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवैध चाळी जमीनदोस्त

By admin | Updated: May 30, 2016 02:44 IST

अनधिकृत अशा साईसागर नागरी वसाहतीतील सुमारे सहाशे खोल्या शुक्रवारी तहसीलदार डॉ. स्नेहल कनिचे यांनी उद्ध्वस्त केल्या.

पालघर : माहीम ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व्हे नं. ९७४ क्षेत्रावरील २६ एकर आदिवासी जमीनीवर उभारलेल्या अनधिकृत अशा साईसागर नागरी वसाहतीतील सुमारे सहाशे खोल्या शुक्रवारी तहसीलदार डॉ. स्नेहल कनिचे यांनी उद्ध्वस्त केल्या.आदिवासी भूखंडावरील अनधिकृत बांधकामे कोणतेही न्यायालय अथवा सरकार नियमीत करू शकत नाही असा निर्वाळा नुकताच उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे विरारच्या कारगील नगरासह, नालासोपारा येथील सुमारे ४९ बेकायदेशीर इमारतीवर हातोडा पडल्याने बेघर झालेले कुटुंबे पालघर तालुक्यातील माहिम, कळवा, आंबाडी देवखोप, सफाळे, बोईसर, पालघर इ. भागात बेकायदेशीररित्या उभारलेल्या आदिवासी जागांवरील बांधकामांचा आश्रय घेत आहेत. त्यामुळे पालघरमध्ये लवकरच दुसरे नालासोपारा, विरारसारख्या बेकायदेशीर वसाहती वसू लागल्या आहेत. कुठल्याही कागदपत्रांची शहनिश न करता अवघ्या शंभर रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर अ‍ॅग्रीमेंट करून आपली आयुष्यभरची कमाई या बेकायदीशीर घरांमध्ये गुंतवली गेली असल्याने शेकडो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. माहीम ग्रामपंचायत राखीव भूखंड विक्री, बेकायदेशीर बांधकामे, बोगस घरपट्टया इ. कृत्यांमुळे तालुक्यात बदनाम झाली असून माजी सरपंच व ग्रामसेवकांच्या आशिर्वादमुळे माहीम ग्रा. पं. अंतर्गत सिडको औद्योगिक वसाहती मधील सर्व्हे नं. ९७४ या ९.१३ हेक्टर (सुमारे २६ एकर) क्षेत्रावर सागर भूतकडे व इतर तेरा मालकांनी संबंधीत विभागाच्या परवानग्या न घेता शासनाने उदरनिर्वाहसाठी दिलेल्या जमीनीवर रामशरण मिश्रा व रामअवध प्रजापती यांच्या सहाय्याने सुमारे ५०० ते ६००, १० बाय २० चौमी. ची बेकायदेशीर घरे व घराच्या जोत्याचे बांधकाम अनेक वर्षापूर्वी केले होते. ही जमीन नंतर धनंजय तिवारी रा. मुंबई यांना विक्री करण्यात आल्यानंतर या प्रकरणात झालेल्या भांडणा दरम्यान कस्तुरबा पो. स्टे. बोरीवली येथे गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पोलीसांनी दिली. रामशरण मिश्रा हा आरपीएफ मध्ये पोलीस आहेत. त्यामुळे तक्रारी झाल्या तरी दीड वर्षापासून यावर कारवाई होत नव्हती. (वार्ताहर)