शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर फलकांचा चेंडू आता सरकारच्या कोर्टात

By admin | Updated: March 5, 2016 03:35 IST

बेकायदेशीर फलक हटवण्यासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पक्ष कार्यकर्ते मारहाण करतात. तर दुसरीकडे संरक्षण मागण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात तासंतास ताटकळत ठेवण्यात येते

मुंबई : बेकायदेशीर फलक हटवण्यासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पक्ष कार्यकर्ते मारहाण करतात. तर दुसरीकडे संरक्षण मागण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात तासंतास ताटकळत ठेवण्यात येते. याची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने आता थेट राज्य सरकारलाच या प्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पोलीस महासंचालकांनाही सर्व पोलीस ठाण्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले.चेंबूर येथील बेकायदेशीर फलक हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, या प्रकरणी न्या. अभय ओक व न्या. आर. डी. धानुका यांच्या खंडपीठाने सर्वांना अवमान नोटीस बजावली. महापालिकेचे अधिकारी संरक्षण मागण्यासाठी देवनार पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना वाट पाहत ताटकळत ठेवले. त्यांना संरक्षणही दिले नाही, त्यामुळे खंडपीठाने या प्रकरणी वरिष्ठांना लक्ष घालण्याचे निर्देश दिले. तसेच संरक्षण मागण्यासाठी आलेल्या पोलिसांना वाट न पाहता संरक्षण देण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना द्यावेत, असे निर्देशही खंडपीठाने पोलीस संचालकांना दिले. (प्रतिनिधी)>सेनेच्या निर्णयाचे स्वागतया प्रकरणी सामान्य माणसांनी उच्च न्यायालयाची पायरी चढण्याऐवजी पक्ष कार्यालयात तक्रार करावी, अशी सूचना गुरुवारी शिवसेनेतर्फे अ‍ॅड. विश्वजीत सावंत यांनी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ती धुडकावून लावली. शुक्रवारच्या सुनावणीवेळी अ‍ॅड. सावंत यांनी सेनेने अशा फलकांविषयी तक्रार करण्यासाठी १८००-२२-८५९५ हा टोल फ्री नंबर उपलब्ध केला असल्याची माहिती खंडपीठाला दिली.त्यावर खंडपीठाने तक्रारदाराचे नाव व त्याची इतर माहिती घेण्यात येणार नाही, याची खात्री करा, असे सेनेला सांगितले. मात्र तक्रारदाराची माहिती गुप्तच ठेवण्यात येईल, असे आश्वासन अ‍ॅड. सावंत यांनी दिले.शिवसेनेचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. याप्रमाणे अन्य राजकीय पक्षांनीही टोल फ्री नंबर उपलब्ध करावा व त्याची दखल घ्यावी, असे म्हणत खंडपीठाने प्रत्येक राजकीय पक्षाला असा टोल फ्री नंबर उपलब्ध करणार का? अशी विचारणा करत एका महिन्यात याचे उत्तर देण्याचे निर्देश दिले.