शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर कृत्य केले नाही

By admin | Updated: October 17, 2015 03:13 IST

कॉसमॉस ग्रुपच्या काही प्रकल्पांमध्ये जी काही अनियमितता आहे, ती मी स्थायी आणि महासभेच्या माध्यमातून उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला

ठाणे : कॉसमॉस ग्रुपच्या काही प्रकल्पांमध्ये जी काही अनियमितता आहे, ती मी स्थायी आणि महासभेच्या माध्यमातून उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, परमार यांच्या चिठ्ठीत काही राजकारण्यांनी त्यांच्यावर दबाव टाकल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणात मी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नसल्याचा दावा महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी केला आहे. परंतु, अद्याप सुसाइड नोटमधील गोल्डन गँगसह इतर राजकारण्यांच्या नावांसंदर्भातला फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येण्याआधीच मुल्ला यांनी केलेल्या या दाव्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात असून पोलिसांनी आता त्यांच्या या पत्रातील दाव्याची तपासणी सुरू केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.नजीब मुल्ला यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना दिलेल्या निवेदनातील या दाव्यामुळे अनेक तर्कवितर्क आता रंगू लागले आहेत. कॉसमॉस, होरायझन या प्रकल्पात आजही अनियमितता असल्याचा दावा त्यांनी या निवेदनात केला आहे. हा प्रकल्प म्हाडाच्या योजनेन्वये केला असून त्यांच्या नियमानुसार खाजगी विकासकाला असा प्रकल्प आणता येत नाही. परंतु, तत्कालीन आयुक्त नंदकुमार जंत्रे यांचे बंधू यामध्ये भागीदार असल्याने त्यांनी या प्रकल्पाला परवानगी दिली होती, असे त्यात म्हटले आहे. बांधकाम सुरू करण्याआधीच म्हाडाबरोबर करार करणे गरजेचे असते. तसेच प्लिंथ सर्टिफिकेटचेही उल्लंघन करण्यात आले. महत्वाचे म्हणजे हा विकासक प्रतिष्ठित व्यक्ती असून त्याची मोठी गुंतवणूक असल्याने त्याने म्हाडाशी संपर्क साधला होता. पण त्यांनी उत्तर न दिल्याने आम्ही प्लिंथ सर्टिफिकेट देत आहोत, असे नोंदवून पालिकेने या प्रकल्पाला परवानगी दिली. हाच मुद्दा आपण महासभेत उपस्थित केला होता. याशिवाय, अनेक बाबींमध्ये यात अनियमितता असल्याने या प्रकल्पाची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्याचा ठराव महासभेत मंजूर केला होता. केवळ, ठाणे महापालिकेचा फायदा व्हावा आणि ठाणेकरांच्या हितासाठी आपण हे केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळेच आपण कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)