शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मुलींसाठी आयआयटीमध्ये जागा वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 02:58 IST

आयआयटीमध्ये विद्यार्थिनींची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची

मुंबई : आयआयटीमध्ये विद्यार्थिनींची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ८ टक्के इतकीच आहे. ही संख्या वाढून २० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट्य आज परिषदेत निश्चित करण्यात आल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. आयआयटी पवई येथे शुक्रवारी देशातील सर्व आयआयटीच्या कौन्सिलची ५१ वी परिषद पार पडली. या परिषदेत आयआयटीची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा उपक्रमांची चर्चा करण्यात आली. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या अधिक असली तरी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या कमी आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी मुलींच्या जागा वाढवण्यात येणार आहे. तसेच, नीती आयोगाप्रमाणेच आयआयटीची कार्यपद्धती सुद्धा तीन भागात विभागली जाईल. याप्रमाणे कार्ययोजना ३ वर्षे, धोरण योजना ७ वर्षे आणि दीर्घकालीन योजना १५ वर्षांची असेल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. देशातील हुशार, कल्पक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षेद्वारे निवड करुन त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश दिला जातो. पण, गेल्या काही वर्षांत आयआयटीमध्ये अभ्यास करत असताना वाढणाऱ्या ताणावर नियंत्रण न मिळवता आल्याने विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. घरापासून लांब असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास, आयआयटीच्या वातावरणाचा ताण येऊ नये म्हणून खास विद्यार्थ्यांसाठी ‘वेलनेस सेंटर’ची स्थापना करण्यात येणार आहे. सेंटरची स्थापना करताना विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी काय करता येईल याचा विशेष विचार केला जाणार आहे. आयआयटीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयआयटीची ओळख करुन देण्याच्या पद्धतीतही आयआयटी कॅम्पस काय आहे हे त्यांना पहिल्याच दिवशी समजावून सांगितले जाणार असल्याचेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)