शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘मित्रमंडळ’ भूखंडाबाबत दुर्लक्ष

By admin | Updated: June 6, 2017 01:30 IST

महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर अतिक्रमण झाल्याची तक्रार आल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांच्या वतीने जागा पाहणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर अतिक्रमण झाल्याची तक्रार आल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांच्या वतीने जागा पाहणी करण्यात आली. परंतु त्यानंतर तब्बल चार महिन्यांनंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली आणि संबंधित विकसकाच्या विरोधात न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला. महापालिकेच्या मालकीचा तब्बल ३५० ते ४०० कोटी रुपयांचा भूखंड संबंधित बांधकाम व्यावसायिकाला मिळवून देण्यासाठी महापालिकांच्या अधिकाऱ्यांचा मोठा हात असल्याचा यावरून स्पष्ट होते. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी केली.मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या भूखंडावर विकसकाने कुंपण घालून अतिक्रमण केले आहे. परंतु याबाबत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार टीकादेखील करण्यात आली. त्यानंतरदेखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर विकसकाने तेथील सुमारे २० झाडांची कत्तल केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यावर उद्यान विभागाचे अधिकारी तेथे भेट देण्यास गेले. तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हुसकावून लावले. त्यामुळे उद्यान विभागाने पोलीस बंदोबस्तात पाहणी केली. त्यात बाभळीची २० झाडे कापली गेल्याचे दिसून आले. महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम व्यावसायिक सूर्यकांत काकडे कोट्यवधी रुपयांचा भूखंड हडप करण्याच्या प्रयत्नात आहेत. >तब्बल चार महिने डोळेझाकचौकातील भूखंडावर अतिक्रमण होत असल्याची तक्रार ३१ जानेवारी २०१७ रोजी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी १ फेबु्रवारी रोजी महापालिका अधिकाऱ्यांनी जागा पाहणी करून येथे अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तब्बल चार महिने जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यामुळे विकसकाला पाठबळ मिळाले व जागेचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला असल्याचे जगताप यांनी सांगितले.