शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पद देताना महिलांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 13, 2016 01:27 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केली जाणारी आंदोलने, कार्यक्रम या सर्वांमध्ये पक्षाच्या नगरसेविका सर्वांत पुढे असतात

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केली जाणारी आंदोलने, कार्यक्रम या सर्वांमध्ये पक्षाच्या नगरसेविका सर्वांत पुढे असतात, त्यांची सभागृहातील कामगिरीही चांगली असताना महापालिकेतील पदे दिली जाताना त्यांचा का विचार होत नाही. त्यांना पदवाटपात न्याय मिळत नाही, अशी व्यथा महिला नगरसेविकांनी रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमोर मांडली. रविवारी राज ठाकरे पुण्यात आले होते. नगरसेविका रूपाली पाटील-ठोंबरे यांनी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार सकाळी राज ठाकरे यांची रूपाली पाटील, अस्मिता शिंदे, अर्चना कांबळे, आशा साने, युगंधरा चाकणकर, सुुशिला नेटके, संगीता तिकोने आदी महिला नगरसेविकांनी भेट घेतली. या वेळी पक्षाचे इतर पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. मनसेच्या वतीने शनिवारी महापालिकेतील पक्षाच्या गटनेतेपदी किशोर शिंदे यांची, तर स्मार्ट सिटीच्या एसपीव्ही सदस्यपदी रवींद्र धंगेकर यांची निवड केली आहे. यापार्श्वभूमीवर महत्त्वाची पदे देताना महिलांचा विचार होत नसल्याने नगरसेविकांमध्ये असलेली नाराजी ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आली. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविकांनी मुख्यसभेत ठिय्या आंदोलन करून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध नारेबाजी केली होती. महिला नगरसेविकांना पक्षात न्याय मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ आता मनसेच्या नगरसेविकांनीही राज ठाकरे यांची भेट घेऊन हीच भावना व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)>संधी मिळाल्यास चांगले कामआंदोलनांमध्ये तसेच सभागृहातील मनसेच्या महिला नगरसेविका नेहमी आक्रमक राहिल्या आहेत. संधी मिळाल्यास त्या चांगले काम करून दाखवू शकतील, अशी भावना राज ठाकरे यांच्यापुढे व्यक्त करण्यात आली. ठाकरे यांनी येत्या काळात यावर नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांना दिले. येत्या २९, ३० जून रोजी पनवेल येथे पुणे, नाशिक व ठाणे येथील नगरसेविकांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या वेळी याबाबत खल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.