शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

श्याम मानवांच्या भुताटकीकडे अंधश्रद्धा समजून दुर्लक्ष करा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 3, 2015 10:55 IST

श्याम मानव विरुद्ध सनातन संस्था असा वाद सध्या पेटलेला असताना यामध्ये शिवसेना उतरली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून श्याम मानव यांच्यावर तुफान टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३ - श्याम मानव विरुद्ध सनातन संस्था असे वाक्-युद्ध सध्या पेटलेले असताना यामध्ये शिवसेना उतरली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून श्याम मानव यांच्यावर तुफान टीका केली आहे. श्याम मानवांनी सनातनसारख्या संस्थांमुळे भारताचा अफगाणिस्तान होईल अशी भीती व्यक्त केली होती. त्याचा संदर्भ देत महाराष्ट्रातील अनेक बिळांत छुपे पाकिस्तानी वळवळत आहेत. या सगळ्यांमुळे महाराष्ट्राचा अफगाणिस्तान आधीच झालाय व अशा हिरव्या दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी श्याम मानव वगैरे भुताखेतांकडून कधीच झाली नाही, अशा शब्दांमध्ये आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
 
सामनाच्या अग्रलेखातील मुद्दे:
 
हिंदू धर्माचा प्रचार, प्रसार करणार्‍या संस्था व व्यक्तींना खतम करायचे असा अफझलखानी विडा उचलणार्‍यांची मोठी यादी आहे. त्या यादीत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या श्याम मानवांचे नाव सध्या आघाडीवर आहे. धर्म व अध्यात्म क्षेत्रातील आपले संत-महात्मे असतील (वाटल्यास त्यांना ‘बुवा’ म्हणा) नाही तर आता सनातनच्या निमित्ताने जे चालले आहे तो सर्व प्रकार म्हणजे हिंदुत्वाच्या प्रचारकांचा कोंडमारा करणारा आहे. सनातन संस्थेवर वेळीच बंदी न घातल्यास महाराष्ट्राचा अफगाणिस्तान होईल, अशी भीती या श्याम मानव नामक भुतास वाटत आहे. अशा भुतांची पैदास सध्या वाढू लागली आहे. हिंदुत्वविरोधी भुतांना हवा तसा नंगानाच करण्याची मुभा आपल्या देशातील तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याने दिली आहे व त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करून ही भुते प्रसिद्धी मिळवत असतात. तोच त्यांच्या पोटापाण्याचा उद्योग असल्याने त्यांच्या रोजगाराची साधने बुडू नयेत असे दयाळू हिंदुत्ववाद्यांना वाटते. काही बुवा, महाराज असतील किंवा ‘सनातन’सारख्या संघटना असतील. आम्ही काही त्यांचे वकीलपत्र घेतलेले नाही, पण ज्याप्रकारे कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांना साधा जामीनही मिळू दिला जात नाही हासुद्धा तालिबानी प्रकार नाही काय? त्यांच्यावर जे काही आरोप ठेवले आहेत त्यांचा तपास, चौकशा, खटले सुरूच राहतील, पण जामीन नाकारणे ही न्याय्य हक्कांची पायमल्ली आहे.
 
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुस्लिम महिलांनी निवडणुकीच्या, किंबहुना राजकारणाच्या फंदातच पडू नये असा एक फतवा काढण्यात आला आहे. ‘मज्लिसे-शुरा-उलेमा-ए-कोल्हापूर’ या संस्थेच्या मौलवींनी हा फतवा जारी केला आहे. हा देखील ‘अफगाणिस्तान’ होत असल्याचा पुरावा आहे. हिंदुस्थानात काही ठिकाणी दहशतवादी ‘इसिस’चे झेंडे फडकवले जात आहेत. आझाद मैदानावरील अमर जवान ज्योतीवर लाथा मारणारी अवलाद महाराष्ट्राचे अफगाणिस्तान करण्याचे स्वप्न पाहात आहे व त्यासाठी कामाला लागली आहे. मात्र या भयंकर लोकांविरोधात ‘ब्र’ काढण्याची हिंमत या हिंदुत्वविरोधी भुताटकीत अजिबात नाही. ओवेसीचे ‘एमआयएम’ ज्याप्रकारे देशात जहर पसरवत आहे तो प्रकार देशाला अफगाणिस्तानच्या दिशेने नेणाराच आहे. तेव्हा ‘एमआयएम’वर बंदी घाला अशी मागणी सनातनबरोबर जोडली असती तर या भुताटकीस सध्याच्या पितृपंधरवड्यात खर्‍या नि:पक्षपाताचे पुण्य लाभले असते, पण हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारकांवरच तुटून पडायचे व आपली भुताटकी जिवंत ठेवायची हीच या लोकांची उलटी खोपडी आहे. त्यामुळे या भुताटकीस कधीच मोक्ष मिळणार नाही! ही अशी भुते नाचतच राहतील. हिंदूंनी त्याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करावे.