शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

राष्ट्रपती पदकविजेत्याची उपेक्षा

By admin | Updated: July 10, 2016 02:45 IST

कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी राहणाऱ्या निसर्गाची भाषा जाणणाऱ्या, पशु-पक्ष्यांचे आवाज हुबेहुब काढणाऱ्या राष्ट्रपती पदकविजेत्या वृद्ध कलावंताला भाकरीच्या शोधात वणवण फिरावे लागत

- साहेबराव नरसाळे,  अहमदनगर

कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी राहणाऱ्या निसर्गाची भाषा जाणणाऱ्या, पशु-पक्ष्यांचे आवाज हुबेहुब काढणाऱ्या राष्ट्रपती पदकविजेत्या वृद्ध कलावंताला भाकरीच्या शोधात वणवण फिरावे लागत आहे. विशेष म्हणजे वृद्ध कलाकारांचे अनुदानही त्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. कळसुबाई शिखराच्या पायथ्याला अकोले तालुक्यातील उडदावणे हे २,३०० लोकसंख्येचे गाव वसले आहे. पावसाळ््यात फेसाळणारे धबधबे, उंचच उंच पर्वतराजी आणि हिरवाईने नटलेला परिसर, अशी निसर्ग संपन्नता गावाला लाभली आहे. येथील आदिवासी कुटुंबात ठकाबाबांचा जन्म झाला. गावातच खडकाळ माळरानावर त्यांची तीन एकर शेती आहे. पण पाणी नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर केवळ भाताचे पीक वगळता काहीही पिकत नाही. घरात सात माणसे आहेत. उपजीविकेचे दुसरे साधनही नाही. त्यामुळे ठकाबाबांनी त्यांच्यातील कला जगासमोर ठेवली. त्यातून चार पैसे मिळत गेले. राष्ट्रपती, पंतप्रधान यांनीही ठकाबाबांच्या कलेचा गौरव केला. अनेक संस्थांनी ठकाबाबांना पुरस्कार देऊन गौरविले. सह्याद्रीच्या डोंगररांगात रोरावणारा वारा, धुवाँधार कोसळणारा पाऊस, फेसाळलेले धबधबे, ओढेनाल्यांचा खळखळाट, बिबट्यांच्या डरकाळ्या, मोरांचे केकाटणे रोजच त्यांच्या कानी पडायचे. जंगलात गुरे चारताना ठकाबाबांना पशु-पक्ष्यांच्या आवाजाला प्रतिसाद देण्याची सवय लागली आणि तेही त्यांचा आवाज काढू लागले. नवी दिल्ली येथे १९६५ मध्ये प्रजासत्ताक दिनी झालेल्या कार्यक्रमात ठकाबाबांच्या पथकाने महाराष्ट्रातून आदिवासी कलेचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या पथकाने देशात प्रथम क्रमांक पटकावला. २००५ मध्ये महाराष्ट्र सरकारनेही त्यांना सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरविले. अनेक संस्थांनी ठकाबाबांच्या कलेचा गौरव केला. ठकाबाबा ‘सेलिब्रिटी’ झाले. त्यामुळे त्यांना आदिवासी वेशभूषा सोडून निटनेटके राहणीमान अंगिकारावे लागले. त्यासाठी मात्र त्यांना कर्ज काढावे लागले. ८४ वर्षांच्या ठकाबाबा यांचे हातपाय आता थरथरतात. उत्पन्नाअभावी बँकेच्या कर्जाचे हप्तेही आता थकले आहेत. मंत्र्यांची आश्वासनेही विरलीअनेक मंत्री, अधिकाऱ्यांनी ठकाबाबांची पाठ थोपटली, त्यांची माहितीही नेली. कलाकाराचे मानधन देऊ असे आश्वासन दिले. पण अद्याप त्यांना मानधन मिळालेले नाही. त्यांचा मुलगा सखाराम हा शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवतोय.