शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

हत्यांच्या तपासाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 16, 2016 01:58 IST

दाभोलकरांच्या हत्येनंतर तेव्हाच्या भेकड राज्यकर्त्यांनी तपासाकडे दुर्लक्ष केले.

सांगली : समाजातील अनिष्ट आणि पिळवणूक करणाऱ्या प्रथा, परंपरांवर विवेकवादी दृष्टिकोनातून विरोध सुरू असताना, प्रतिगाम्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन मोहरे आपण गमावले. दाभोलकरांच्या हत्येनंतर तेव्हाच्या भेकड राज्यकर्त्यांनी तपासाकडे दुर्लक्ष केले.सध्याच्या सरकारकडून मी आशावादी स्थिती नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी रविवारी येथे केले.दुसऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या समारोप डॉ. पाटील म्हणाले, जादूटोणाविरोधी कायदा करताना तत्कालीन शासनाने दिरंगाई केल्याने चळवळीतील कार्यकर्त्यांत एक अस्वस्थपणा आहे. सध्याचे शासन परिवर्तनवादी विचार करणारे नसल्याने आजही समाजातील परिस्थिती आशादायक नाही. ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ म्हणाले, आपल्या विवेकवादी विचाराने समाजात परिवर्तन घडवू पाहणाऱ्या तीन विवेकवादी विचारवंतांच्या हत्या झाल्या. तपास यंत्रणांना आरोपी माहीत असतानाही त्याचा अभ्यास राज्यकर्त्यांकडून होत नसल्याने एकप्रकारची अस्वस्थता समाजात असल्याचेही त्यांनी सांगितले. गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे चपलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरातील बाजारपेठेला अडचणी जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले की, आजच्या नव्या पिढीला भारतीय समाज कसा असावा, याची स्वप्ने पडत असल्याचे या संमेलनातून दिसून आले. समाजव्यवस्थेतील टाकाऊ, भ्रामक, असत्य व गती मंद करणारे विचार नाकारण्याची इर्षा एक प्रेरणा देऊन जाणारी आहे.सध्या विचारांवर बंदी आणण्याचे, त्यांना चाकोरीत बंदिस्त करण्याचे चालू असलेले प्रयत्न कृतीतून हाणून पाडण्याचे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)