शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलच्या अतिक्रमणाकडेही दुर्लक्ष

By admin | Updated: June 9, 2016 03:00 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हॉटेलचालकांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हॉटेलचालकांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. व्यावसायिकांना देखभाल शाखा सुरक्षा रक्षकांनी अभय दिले आहे. खाद्यपदार्थ तयार करण्याची परवानगी नसलेल्या स्टॉलचालकांनीही अनधिकृत खानावळ सुरू केल्या असून, स्वच्छतेचे सर्व नियमही धाब्यावर बसविले आहेत. बाजार समितीमध्ये देखभाल शाखा, सुरक्षा रक्षक व प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण घोटाळा झाला आहे. व्यापाऱ्यांनी गाळ्यांवर पोटमाळे व वाढीव एक मजल्याचे बांधकाम केले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त हॉटेलचालकांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. धान्य मार्केटमध्ये बाजार समितीने दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागा हॉटेलचालकांनी व्यापली आहे. काहींनी एक मजल्याचे वाढीव बांधकाम केले आहे. आतापर्यंत बाजार समिती प्रशासनाने वारंवार त्यांना नोटीस दिल्या, परंतु प्रत्यक्षात अतिक्रमण कधीच काढलेले नाही. नोटीस देवून तडजोडी केल्या जात असल्याची चर्चा मार्केटमध्ये आहे. बिनधास्तपणे मोकळ्या जागेचा वापर करणाऱ्यांवर काहीच कारवाई होत नाही. सर्वाधिक अतिक्रमण फळ मार्केटमध्ये झाले आहे. येथे तयार खाद्यपदार्थ विक्रीसाठी एपीएमसीने परवानगी दिली आहे. परंतु प्रत्यक्षात सर्वांनी अनधिकृत खानावळ सुरू केली आहे. मार्केटमध्ये पश्चिम बंगाल व काही प्रमाणात बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्य करत आहेत. या कामगारांसाठी अनधिकृत खानावळ सुरू झाल्या आहेत. अनधिकृत कँटीनच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य असते. प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. त्याच ठिकाणी हे कामगार जेवण करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. फळ मार्केटमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात चार वर्षांपूर्वी प्रशासनाने जोरदार मोहीम सुरू केली होती. अनधिकृत शेड काढले. सिलिंडर जप्त केले होते. हॉटेल चालकांबरोबर प्रशासनाचे मतभेद झाले होते. यामुळेच त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू केली होती. प्रशासनाच्या मागण्या पूर्ण केल्यानंतरही कारवाई होत असल्याने हॉटेलचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी झालेल्या भांडणातून अधिकाऱ्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रारही एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये केली होती. परंतु नंतर काही दिवसांमध्ये हॉटेल चालकांचे अतिक्रमण जैसे थे झाले. तेव्हापासून पुन्हा कधीच कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व अतिक्रमणाला अभय देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. >फळ मार्केटमध्येसर्वाधिक अतिक्रमण धान्य मार्केटमध्ये बाजार समितीने दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागा हॉटेलचालकांनी व्यापली आहे. बाजार समिती प्रशासनाने वारंवार त्यांना नोटीस दिल्या, परंतु प्रत्यक्षात अतिक्रमण कधीच काढलेले नाही. सर्वाधिक अतिक्रमण फळ मार्केटमध्ये झाले आहे. येथे तयार खाद्यपदार्थ विक्रीसाठी परवानगी दिली आहे.