शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुक लढवायची असेल तर विकासाचे ‘व्हिजन’ सांगा !

By admin | Updated: January 8, 2017 02:52 IST

राज्य निवडणूक आयोग विचारणार प्रतिज्ञापत्रामध्ये सात प्रश्न : मनपा निवडणुकीचा कार्यक्रम आठवडाभरात!

अकोला, दि. ७- महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये उच्छुक उमेदवारांना आता प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या भागातील विकासाचे ह्यव्हिजनह्ण विचारले जाणार आहे. त्यासाठी प्रतिज्ञापत्रात उमेदवारांना विकासासंबंधी उमेदवारांची संकल्पना काय आहे, यासंदर्भात सात प्रश्न विचारण्यात येणार आहेत, असे स्पष्ट करतांनाच राज्यातील जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम येत्या आठवडाभरात (१५ जानेवारीपूर्वी) जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी शनिवारी येथे दिले. अकोला महानगरपालिका आणि बुलडाणा जिल्हा परिषद निवडणूक पूर्वतयारीची आढावा बैठक घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम १५ जानेवारीपूर्वी जाहीर होणार असून, आचासंहिता लागू होणार असल्याचे सांगत महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमध्ये संगणकाचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येणार असून, निवडणुकीत उमेदवारांना उमेदवारी अर्ज आणि त्यासोबत सादर करावयाचे प्रतिज्ञापत्र ऑनलाइन सादर करावे लागणार आहेत. ऑनलाइन उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्ज रद्द होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच या प्रक्रियेत उमेदवारांना त्यांच्या इच्छेप्रमाणे अर्ज भरता येतात. ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यात येत असल्याने, उमेदवारांच्या माहितीचा ह्यडाटाह्ण राज्य निवडणूक आयोगाकडे उपलब्ध होत आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ४0 हजार उमेदवारांचा ह्यडाटाह्ण निवडणूक आयोगाकडे उपलब्ध झाला, असे ज.स. सहारिया यांनी सांगितले. उमेदवारांची माहिती मतदारांना मिळावी तसेच निवडणुका मुक्त आणि पारदश्री वातावरणात पार पाडण्यासाठी या उपाययोजना राबविण्याचा मानस आहे. प्रत्येक उमेदवार आणि राजकीय पक्षांनी निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्च सादर न केल्यास निवडून आलेले संबंधित सदस्य आणि नगरसेवक अपात्र होऊ शकतात. निवडणूक निकालानंतर उमेदवाराने २0 दिवसांत आणि राजकीय पक्षांनी ६0 दिवसांत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक असल्याचेही ज.स. सहारिया यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर व जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते.प्रतिज्ञापत्रातील उमेदवारांचा गोषवारा करणार जाहीर!महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांकडून उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीचा गोषवारा जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये उमेदवारांचे नाव, शिक्षण, स्थावर आणि जंगम मालमत्ता, गुन्हय़ाची शिक्षा आणि प्रलंबित प्रकरण इत्यादी प्रकारच्या माहितीचा गोषवारा मनपा व जिल्हा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे, असेही राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी स्पष्ट केले.