शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
3
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
4
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
5
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
6
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
7
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
8
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
9
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
10
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
11
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
12
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
13
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
14
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
15
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
16
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
17
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
18
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
19
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
20
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव

बायपाससाठी ‘व्हेन’ वापरल्यास ‘ब्लॉक’ची शक्यता

By admin | Updated: September 23, 2014 01:09 IST

बायपाससाठी हाताची किंवा पायाची ‘व्हेन’ (नाडी) वापरली असेल तर ती परत ब्लॉक होण्याचं प्रमाण ५० टक्के असते, परंतु ‘लीमा-रिमा-व्हाय’ या पद्धतीचा वापर केल्यास त्या ब्लॉक होण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या

सौरभ वर्षने : लिमा-रिमा-व्हाय पद्धतीमुळे ब्लॉकचे प्रमाण कमी नागपूर : बायपाससाठी हाताची किंवा पायाची ‘व्हेन’ (नाडी) वापरली असेल तर ती परत ब्लॉक होण्याचं प्रमाण ५० टक्के असते, परंतु ‘लीमा-रिमा-व्हाय’ या पद्धतीचा वापर केल्यास त्या ब्लॉक होण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते, असे मत डॉ. सौरभ वर्षने यांनी व्यक्त केले.रामदासपेठ येथील केअर हॉस्पिटलच्यावतीने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. वरुण भार्गव, डॉ. अच्युत खांडेकर आदी उपस्थित होते.डॉ. वर्षने म्हणाले, डाव्या कोरोनरीचा मुख्य भाग म्हणजे मेनस्टेम ब्लॉक असेल तर बायपास सर्जरी हाच उपचार ठरतो. जेव्हा बलून अँजिओप्लास्टीने कोरोनरी ओपन करणं शक्य नसतं, अशा वेळी बायपास सर्जरी करावी लागते. यासाठी बहुसंख्य डॉक्टर रु ग्णांमध्ये पायातील ‘सॅफेनस व्हेन‘ किंवा हाताच्या मनगटाजवळची ‘रेडियल आर्टरी’ बायपाससाठी वापरतात. परंतु ही व्हेन परत ब्लॉक होण्याची शक्यता वाढते. शिवाय रुग्णाच्या पायाची किंवा मनगटाजवळील व्हेन कापली जात असल्याने रुग्णाला काही आठवडे खाटांवर काढावे लागतात. परिणामी रुग्णालयाचा खर्चही वाढतो. परंतु बायपाससाठी स्टर्नमच्या दोन्ही बाजूच्या लिमा (लेफ्ट इन्टर्नल मॅमरी आर्टरी) आणि रिमा (राईट इन्टर्नल मॅमरी आर्टरी) या आर्टरी वापरल्यास भविष्यात ‘ब्लॉक’च्या प्रमाणाची टक्केवारी फार कमी होते. याला ‘लीमा-रिमा-व्हाय’ ही पद्धत म्हणतात. पाश्चात्य देशात या शस्त्रक्रियेचे प्रमाण मोठे आहे. मागील पाच वर्षांपासून ही शस्त्रक्रिया डॉ. सुधांशु भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनात भारतात सुरू आहे. केअर इस्पितळात अशा पद्धतीच्या २५० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. जास्त वयाच्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया लाभदायक ठरत आहे, असेही ते म्हणाले.(प्रतिनिधी)