शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शनिचौथ-यावर जाण्यापासून रोखल्यास FIR दाखल करू - तृप्ती देसाई

By admin | Updated: April 2, 2016 09:27 IST

न्यायलयाच्या आदेशानंतर भूमात ब्रिगेडच्या तृप्ती देसाई शनिशिंगणापूरकडे रवाना झाल्या असून कोणी रोखल्यास FIR दाखल करू असा इशारा त्यांनी दिला.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २ - प्रार्थनास्थळांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने प्रवेश मिळणे हा महिलांचा मूलभूत हक्क आहे व या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने सक्रियतेने पावले उचलावीत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. या आदेशामुळे शनी चौथ-यावर महिलांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई शनिवारी सकाळी शनि मंदिराच्या दिशेने रवाना झाल्या. ' शनिशिंगणापुरात आम्हाला आज कोणी रोखेल असं वाटत नाही, कोर्टाचा आदेश हा आमच्यासाठी मोठा विजय आहे. मात्र आम्हाला आज कोणी शनिचौथ-यावर जाण्यापासून रोखले तर आम्ही एफआयआर दाखल करू' असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला. 
अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथील शनीदेवाच्या मंदिरात लागू असलेल्या महिलांच्या प्रवेशबंदीच्या विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विद्या बाळ व अ‍ॅड. नीलिमा वर्तक यांनी केलेली जनहित याचिका मुख्य न्यायाधीश न्या. डी. एच. वाघेला व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने निकाली काढली. प्रार्थनास्थळांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने प्रवेश मिळणे हा महिलांचा मूलभूत हक्क आहे व या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने सक्रियतेने पावले उचलावीत, असा आदेश न्यायालयाने दिला. हा आदेश फक्त शनी शिंगणापूरच्या संदर्भात दिलेला नसून महाराष्ट्रात हिंदू मंदिरांमध्ये प्रवेशाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पक्षपात पूर्णपणे निषिद्ध ठरविणारा ‘महाराष्ट्र हिंदू प्लेस आॅफ वर्शिप (एन्ट्री ऑथरायजेशन) अ‍ॅक्ट’ या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. समान वागणूक हा महिलांचा मूलभूत हक्क आहे व त्या हक्काची जपणूक करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असेही खंडपीठाने नमूद केले.
आम्ही व्यकितगत पातळीवरील तक्रारींमध्ये लक्ष न घालता हे सर्वसाधारण स्वरूपाचे निर्देश देत आहोत. यानंतर प्रस्तुत कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याची कोणाची तक्रार असेल तर त्याने तशी तक्रार स्थानिक प्राधिकाऱ्यांकडे करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या कायद्यानुसार मंदिरात प्रवेश नाकारण्यास सहा महिने कारावासाची तरतूद आहे.