शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वस्तू हरवल्यास "लॉस्ट अँड फाऊंड"च्या माध्यमातून करता येणार ऑनलाइन तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 22:19 IST

मोबाईल, वॉयलेट, पर्स किंवा लायसन्स, आधार कार्ड, पासपोर्ट अशा महत्वपूर्ण वस्तू हरवल्या की पुणेकरांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी जावे लागते.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 19 - मोबाईल, वॉयलेट, पर्स किंवा लायसन्स, आधार कार्ड, पासपोर्ट अशा महत्वपूर्ण वस्तू हरवल्या की पुणेकरांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी जावे लागते. केवळ एक प्रमाणपत्र घेण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी वाया जातो. पण तुमचा हाच कालावधी वाचला तर? पुणे पोलिसांनी हाच बहुमूल्य वेळ वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. आता घरबसल्या एका क्लिकवर पुणेकरांना मिसिंग वस्तूंची तक्रार नोंदविणे सहज शक्य होणार आहे. पुणे पोलिसांनी त्यांच्याच संकेतस्थळावर " लॉस्ट अँड फाऊंड" हे पोर्टल विकसित केले आहे. पासपोर्टसाठी आपण ज्याप्रमाणे आॅनलाईन पद्धतीचा वापर करतो तशाच स्वरूपात हरवलेल्या वस्तूंसाठी आॅनलाईन माध्यमाद्वारे तक्रार अर्ज भरता येणार आहे. अर्जात माहिती अपलोड केल्यानंतर डिजिटल सिग्नेचरचा वापर करून ईमेल आयडी अटँच करून हा अर्ज पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अर्जात माहिती टाकण्यासाठी आधार कार्ड, पँनकार्ड, मोबाईल नंबर टाकल्यानंतर पेटीएमप्रमाणे ओटीपी नंबर मेसेज केला जाईल, तो टाकल्यानंतर अर्ज भरता येऊ शकेल. त्यामुळे आता यापुढे हरवलेल्या वस्तूंसंदर्भात प्रमाणपत्र घेण्यासाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज भासणार नाही.या पोर्टलच्या माध्यमातून हरवलेल्या वस्तूंसंदर्भात आॅनलाइन माहिती देऊन प्रमाणपत्र आणि पावती घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आर्थिक व सायबर सेलचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. यावेळी पोलीस उपायुक्त ( गुन्हे) पंकज डहाणे आणि सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक राधिका फडके उपस्थित होते. पोर्टलमध्ये लॉस्ट अँंड फाऊंड असे दोन विभाग करण्यात आले आहेत, तुमच्या हरवलेल्या वस्तूंची नोंद लॉस्ट मध्ये होईल आणि त्याची माहिती नोडल आॅफिसरसह शहरातील 39 पोलीस ठाण्यांना जाईल. आधार आयडेन्टिफिकेशशिवाय अर्ज मंजूर केला जाणार नाही. तुम्ही या अर्जाच्या किती कॉपी काढल्यात त्याची माहितीही तात्काळ करू शकणार आहे. तुमची वस्तू सापडली तर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून फाऊंड मध्ये नोटीफिकेशन तक्रारदाराला दिले जाईल. जर तक्रारदाराला ती वस्तू सापडली तर त्याने देखील फाऊंडमध्ये त्याची नोंद करावी. लवकरच शैक्षणिक कागदपत्रांचाही यात समावेश केला जाणार आहे. पंकज गोडे, अविराज मराठे आणि प्रणितकुमार यांनी या पोर्टलची निर्मिती केली आहे.------------------------------------------------------------शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये 150 मिसिंगच्या तक्रारीशहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दररोज कमीत कमी चार ते पाच मिसिंग वस्तूंच्या तक्रारीची नोंद होते. महिन्याभरात 150 तक्रारी नोंदविल्या जातात. प्रत्येकाची तक्रार लिहून घेण्यासाठी दोन तासाचा अवधी लागतो, या पोर्टलमुळे पोलिसांसह पुणेकरांचाही वेळ वाचणार आहे.