शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस संपवायची नसेल तर राष्ट्रवादीचे जोखड झुगारा

By admin | Updated: September 1, 2014 02:10 IST

गेल्या दहा वर्षांत आमच्या मतदारसंघांमध्ये पंजा नाही. घड्याळ्याच्या वर्चस्वाखाली आम्हाला राजकारण करावे लागते. राष्ट्रवादीचे जोखड एकदाचे झुगारा.

मुंबई : गेल्या दहा वर्षांत आमच्या मतदारसंघांमध्ये पंजा नाही. घड्याळ्याच्या वर्चस्वाखाली आम्हाला राजकारण करावे लागते. राष्ट्रवादीचे जोखड एकदाचे झुगारा. आम्हाला लढण्याची संधी द्या, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीच्या कोट्यातील मतदारसंघांसाठी मुलाखतींकरता आलेल्या काँग्रेसच्या इच्छुकांनी रविवारी पक्षाच्या निवड मंडळाला केली. २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या ११४ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती दिवसभर टिळक भवनात झाल्या. यावेळी इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह होता. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर.आर.पाटील, सार्वजनिक उपक्रम मंत्री अशा राष्ट्रवादीच्या बहुतेक दिग्गजांच्या मतदारसंघांत उमेदवारी मागणारे काँग्रेसजन मोठ्या संख्येने आले होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांच्या पुसद मतदारसंघासाठी मात्र काँग्रेसचा कोणीही दावेदार नव्हता. राष्ट्रवादीची दादागिरी खूप झाली. त्यांचे आमदार असल्याने सगळ्या कमिट्यांवर त्यांचेच कार्यकर्ते घेतले जातात. महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांना सन्मान दिला जातो. आमचे सरपंच, नगरसेवक विकासासाठी आमदारांकडे निधी मागायला गेले की हाकलून लावतात. हा अपमान किती दिवस सहन करायचा, अशी तीव्र भावना सिंदखेडराजा, मेहकर, देवळाली, जळगाव, मूूर्तिजापूर, औरंगाबाद ग्रामीण, इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, विक्रोळी, कुर्लासह बहुतेक मतदारसंघांतून आलेल्या इच्छुकांनी निवड मंडळासमोर मांडली. इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांनी टिळक भवनात उभारलेल्या मंडपात हीच भूमिका पत्रकारांसमोर मांडली. (विशेष प्रतिनिधी)