शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

उपाययोजना न केल्यास जनभावना भडकेल

By admin | Updated: September 6, 2015 00:51 IST

राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असून, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जटील बनला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना न केल्यास जनभावना भडकून

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असून, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जटील बनला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना न केल्यास जनभावना भडकून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिला. दुष्काळाबाबत योग्य ती माहितीच शासनाकडे नसल्याचा आरोप करीत मुख्यमंत्र्यांना सत्तेचे गांभीर्य नसल्याची टीकाही त्यांनी केली. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर शनिवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, शासनाने रोजगार हमीअंतर्गत कामे सुरूकेली पाहिजेत़ अनेक पाणी योजना, वीजबिलाची थकबाकी असल्याने त्या बंद पडल्या आहेत़ ही वसुली स्थगित करून त्यांना वीजपुरवठा सुरू केला पाहिजे़ ग्रामीण भागातील करच माफ करावेत, पण सध्या किमान स्थगिती तरी दिली पाहिजे. दुष्काळी परिस्थितीचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. केवळ फीमाफी करून चालणार नाही, तर त्यांच्या राहण्या-जेवण्याचीही व्यवस्था करण्याची गरज आहे. हे अधिकार जिल्हाधिकारी - तहसीलदार स्तरापर्यंत मिळाले तर कार्यवाही सोपी होईल. सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नसल्याचा आरोप करताना पवार यांनी चारा छावण्यांबाबत काढलेल्या अधिसूचनेचा दाखला दिला़ ते म्हणाले, की शासनाने फक्त बीड, लातूर आणि उस्मानाबाद येथे छावण्या सुरू करण्याचे परिपत्रक काढले. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांना भेटून परिस्थितीची कल्पना दिली. एक महिना वाट पाहू़ आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही. मात्र काहीच निर्णय घेतला नाही तर संकटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी जनावरांसह आंदोलन हाती घ्यावे लागेल़ ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना आलेल्या धमकीपत्राविषयी ते म्हणाले, की कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका घेण्याच्या वृत्तीमुळे राज्यातील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे़ केंद्र आणि राज्यात सत्तांतरानंतर अशा प्रवृत्तीचा आत्मविश्वास वाढला असल्याची टीका त्यांनी केली़ (प्रतिनिधी)राज ठाकरेंकडे दूरदृष्टी राज ठाकरे यांच्या टीकेला पवारांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, की राज ठाकरे हे अत्यंत दूरदर्शी आणि जनतेची अखंड सेवा करणारे नेतृत्व आहे. उद्या भूकंप झाला तरी त्याला ते राष्ट्रवादीला जबाबदार धरतील, असे ते म्हणाले.सरकार-संघात फरक नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीला हजेरी लावल्याबद्दल ते म्हणाले, की सरकार आणि संघ यात आपण फरक मानत नाही़ ते सरकारचाच एक भाग आहे. बिहार निवडणुकीत मुलायमसिंह यादव यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी २२ सप्टेंबरला दिल्लीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्याकडे बैठक आहे़ त्यात काय ते ठरेल, असे त्यांनी सांगितले.चारा छावण्यांचा पेचआजपर्यंत सहकारी साखर कारखाने आणि विविध संस्था चारा छावण्या उभारत होत्या. मात्र या वर्षी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चारा छावण्या उभारू नयेत, सरकारनेच या छावण्या चालवाव्यात, असे सांगत शरद पवार यांनी सरकारला पेचात पकडले आहे. मुख्यमंत्र्यांनी पूर्वी चारा कोणी खाल्ला, असा सवाल करून हेतूबद्दल शंका घेतली होती. शंकेला जागा नको, सरकारला छावण्या उभारण्यासाठी कार्यकर्ते मदत करतील; परंतु स्वत: उभारणार नाहीत, असे पवार यांनी म्हटले आहे.