शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

असेल हिंमत तर करा चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 03:24 IST

केंद्रात आणि राज्यातही भाजपाचे सरकार आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी करावी

मुंबई : केंद्रात आणि राज्यातही भाजपाचे सरकार आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी करावी, असे आव्हान शिवसेनेने भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. भाजपा खासदार किरीट सोमय्या वारंवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांना संपत्ती घोषित करण्याचे आव्हान दिले होते. यासंदर्भात खासदार राहुल शेवाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका मांडली. ‘किरीट सोमय्या हे आजवर कॉपोर्रेट कंपन्यांना ब्लॅकमेल करत आले आहेत. त्यांनी खुद्द नितीन गडकरींनाही अशाच पद्धतीने ब्लॅकमेल केले होते. पूर्ती घोटाळा त्यांनीच उघड केला; पण पुढे या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खोटे आरोप करायची सोमय्यांची रीत आहे, अशी टीका शेवाळे यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाकडे कुठलीही बोगस कंपनी किंवा बेहिशेबी संपत्ती नाही हे मी जबाबदारीने सांगतो. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी पुराव्यानिशी आरोप करावेत. हवेत आरोप करून ठाकरेंना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नका. वैयक्तिक आरोप करून मुख्यमंत्र्यांनी पराभव स्वीकारल्याचं स्पष्ट आहे, असे शेवाळे म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत हतबल आणि अज्ञानी मुख्यमंत्री आहेत. त्यांना स्वत:च्या अधिकारांची आणि कारभाराची जाण नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)