शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटी नोंदविण्यास टाळाटाळ केल्यास बडतर्फी

By admin | Updated: June 12, 2014 04:27 IST

अ‍ॅट्रॉसिटीच्या तक्रारी नोंदविण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना केवळ निलंबित न करता शासकीय सेवेतून थेट बडतर्फ करण्यात येईल

मुंबई : अ‍ॅट्रॉसिटीच्या तक्रारी नोंदविण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना केवळ निलंबित न करता शासकीय सेवेतून थेट बडतर्फ करण्यात येईल. तसेच अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील फिर्यादीवर विरोधी तक्रार आल्यास त्या दोन्ही प्रकरणांचा तपास पोलिस उप-अधीक्षक करतील आणि स्थानिक पोलिसांना या प्रकरणात कार्यवाही करता येणार नाही, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत सांगितले.तसेच दलितांच्या रक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्णात विशेष गट तयार केले जातील. दलित अत्याचारविरोधी कायद्याखालील खटल्यांसाठी सहा जलदगती न्यायालये सुरू केली जातील. कणगरा पोलीस हल्ला प्रकरणाची चौकशी गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपवली जाईल, असेही गृहमंत्र्यांनी जाहीर केले.महिला तसेच दलित अत्याचाराच्या विषयावर विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. २०१२ साली दिल्लीत घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तक्रार दाखल करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात पुढे येऊ लागल्या आहेत. २०१२मध्ये महिलांशी संबंधित असलेल्या १४ प्रकारच्या गुन्ह्णांची १७ हजार ८०० प्रकरणे नोंदविण्यात आली होती. २०१३मध्ये ही संख्या २७ हजार ३०० झाली. यंदा हे गुन्हे ५६३ने कमी आहेत, मुंबई शहर महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर असल्याचा उल्लेख ही त्यांनी केला. (प्रतिनिधी)