शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
3
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
5
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
6
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
7
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
8
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
9
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
10
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
11
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
12
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
13
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
14
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
15
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
16
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
17
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
18
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
19
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
20
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 

हो य हो य वा र क री । पा हे पा हे रे पं ढ री ।।

By admin | Published: July 26, 2015 2:59 AM

ज्यापदार्थाची सत्ता कोणत्याही काळामध्ये बाधित होत नाही त्या सत्तेला पारमार्थिक सत्ता असे म्हणतात. असे पारमार्थिक सत्तावान जे ब्रह्मतत्त्व ते स्वगत, सजातीय, विजातीय भेदरहित

- ह.भ.प. अ‍ॅड. जयवंत महाराज बोधलेज्यापदार्थाची सत्ता कोणत्याही काळामध्ये बाधित होत नाही त्या सत्तेला पारमार्थिक सत्ता असे म्हणतात. असे पारमार्थिक सत्तावान जे ब्रह्मतत्त्व ते स्वगत, सजातीय, विजातीय भेदरहित असून सत्, चित्, आनंद, नित्य, पूर्ण असे आहे. हेच ब्रह्मतत्त्व संपूर्ण चराचरामध्ये भरलेले आहे. श्रुतीमाता आपणास स्पष्ट सांगते की, ‘सर्व खल्विदं ब्रह्म।’ असे हे व्यापक ब्रह्मतत्त्व तेच ‘मी’ आहे, असा अनुभव येणे म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त होणे होय. असा ब्रह्मज्ञानाचा अनुभव अंतरी आला असता त्याची चिन्हे देहावर उमटतात. तुकाराम महाराज सांगतात.. उमटती ठसे। ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे।।ब्रह्मप्राप्तीची ही चिन्हे (ठसे) पाच आहेत. अभिन्नता, अभयरूपता, आनंदरूपता, अनन्यता, अजन्मस्थिती ही पाच चिन्हे आहेत. ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला महात्मा सर्वसामान्यांप्रमाणे जरी दिसत असला तरी देहसंबंध पसाऱ्याचा व त्याचा काहीही संबंध उरलेला नसतो. काही कर्तव्य नाही, काही प्राप्तव्य नाही अशीच अवस्था झालेली असते. पंचदशीकार विद्यारण्यस्वामी सांगतात, धन्योऽहं धन्योऽहं कर्तव्य मे न विद्यते किंचित्। धन्योऽहं धन्योऽहं प्राप्तव्यं सर्वमद्य संपन्नम्।।पंचदशीकारांनी या अवस्थेलाच खऱ्या अर्थाची धन्यता सांगितलेली आहे. प्रापंचिक जीवनामध्ये सत्ता, संपत्ती, संतती प्राप्तीमध्ये धन्यता सांगितली जाते. परंतु पारमार्थिक जीवनामध्ये संतभेट व भगवद् प्राप्ती हीच खरी धन्यता आहे. या धन्यतेमध्ये काहीही प्रापंचिक कर्तव्य किंवा प्राप्तव्य राहिलेले नसते. ज्या ज्या इच्छा केल्या त्या त्या पूर्ण झालेल्या असतात. तुकाराम महाराज सांगतात, कृतकृत्य झालो। इच्छा केली ती पावलो।।अशी ही परिपूर्णतेची अवस्था प्राप्त होणे व पुन्हा भगवंताच्या सगुण रूपांविषयी प्रेम निर्माण होऊन त्याच्या भजनात तल्लीन राहणे हे वारकरी संप्रदायाचे मूळ सूत्र आहे. याकरिता ‘ज्ञान गिळोनि गावा गोविंदु गा।’ हे वचन प्रसिद्ध आहे. याकरिता आवश्यकता आहे ती भक्तीची। ज्ञानीयांचे राजे संत ज्ञानेश्वर महाराजसुद्धा म्हणतात,माझे मनीची आवडी।पंढरपुरा नेईन गुडी।।याकरिता लागणारी जी भक्ती आहे ती कोणती? काय तिची व्याख्या? देवऋर्षी नारदमुनी भक्तिसूत्रात सांगतात,।।सा त्वस्मिन्परमप्रेमरूपा।।भगवंतावर परमप्रेम असणे म्हणजेच भक्ती होय. प्रेमामध्ये वात्सल्यप्रेम, सख्य प्रेम, कामरूपी प्रेम आणि परमप्रेम असे प्रकार आहेत. यामध्ये परमप्रेम म्हणजे निष्काम प्रेम होय. या प्रेमालाच भक्ती म्हणतात.वारकरी संप्रदायामध्ये याच तत्त्वज्ञानाचा सर्व साधू-संतांनी विचार सांगितलेला आहे. संत तुकाराम महाराज सांगतात,‘‘मी भक्त तू देव ऐसे करी।’’या अवस्थेमध्ये भक्तीचा आनंद घेता येतो. घेतलेला आनंद इतरांना देता येतो. पंढरीच्या वारीमध्ये हेच चित्र आपणास सर्वत्र दिसून येते. इथे सर्व जण आपले मोठेपण विसरलेले असतात. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान व भक्ती या दोन तत्त्वांचा समन्वय पाहावयास मिळतो. शास्त्रीय दृष्टीने ‘ज्ञान’ हीच सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये या ज्ञान अवस्थेनंतरही भक्तीची अवस्था सांगितली आहे. यालाच वारकरी संप्रदायामध्ये ‘ज्ञानोत्तर भक्ती’ असे म्हणतात. हेच वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आहे. याच तत्त्वज्ञानात जगणारा हा पंढरीचा वारकरी आहे.