शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ जाहिरातीमागे दोन ताईंमधील तणाव तर नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 06:13 IST

बालहक्क आयोगासाठी दिली होती जाहिरात; - विभाग म्हणतो, नव्याने जाहिरात देऊ

- यदु जोशी

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या विजया रहाटकर असताना त्यांना पूर्वकल्पना न देता नव्या अध्यक्षाच्या भरतीसाठी महिला व बालकल्याण विभागाने जाहिरात देण्यामागे रहाटकर आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील ‘सलोख्याचे’ संबंध कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

मुंडे आणि रहाटकर या दोघीही मराठवाड्यातल्या पण दोघींमध्ये फारसे सख्य नसल्याचे बोलले जाते. रहाटकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आयोगाचे अध्यक्षपद मिळाले. हा आयोग पंकजातार्इंच्या विभागाच्या अखत्यारित येतो. तीन वर्षांपूर्वी विजयातार्इंची नियुक्ती झाली तेव्हा अध्यक्ष वा सदस्य पदासाठी जाहिरात देण्यात आलेली नव्हती. रहाटकर यांची नियुक्ती ‘वरून’झाल्याचे बोलले गेले. त्यांचे दिल्लीतही मोठे वजन आहे. गेली तीन वर्षे आयोग आणि महिला व बालकल्याण विभागाचे संबंध सलोख्याचे राहिलेले नाहीत.

महिला आयोगाच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी एकदाही जाहिरात देण्यात आली नाही. मग ती आताच का देण्यात आली? दोन तार्इंमधील तणावाचा अशी जाहिरात येण्यामागे काही संबंध आहे का? याची चर्चा आता सुरू झाली आहे. विजयाताई अध्यक्ष झाल्यानंतर काहीच महिन्यांत राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी पंकजातार्इंच्या मर्जीतील विजय घुगे यांना नेमण्यात आले तेव्हा मात्र जाहिरात देण्यात आली होती. जवळपास दीडएकशे अर्ज आले. घुगे यांनी अर्जच केलेला नव्हता तरीही त्यांना अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले.

बालहक्क आयोगाच्या अध्यक्षपदासाठी जाहिरात दिली जाते मग महिला व बालकल्याण विभागाच्याच अखत्यारित येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी जाहिरात का देऊ नये, असे समर्थनही पुढे आले आहे. विहार दुर्वे या नागरिकाने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ ९ फेब्रुवारीला संपत असल्याने नवीन अध्यक्ष नियुक्तीची कार्यवाही करण्याबाबत महिला व बालकल्याण विभागाला सूचित केले होते. मात्र, जाहिरात द्या असे काही म्हटले नव्हते.मुळात महिला आयोगाचे अध्यक्षपद जाहिरातीने भरले जाणार असल्याबाबत विजयातार्इंना कुठलीच कल्पना नव्हती. जाहिरात प्रसिद्ध होताच अस्वस्थ झालेल्या विजयातार्इंनी मग आपले वजन वापरत जाहिरातच रद्द करविली, असे सूत्रांनी सांगितले. महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता वेद सिंघल यांना या बाबत विचारले असता त्या म्हणाल्या की अध्यक्षासाठीच्या जाहिरातीत त्या पदासाठी नेमकी कोणती शैक्षणिक पात्रता व अनुभव हवा आहे या बाबत स्पष्टता नसल्याने जाहिरात रद्द करण्यात आली. ती नव्याने दिली जाईल.‘काहीच कल्पना नाही’रहाटकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, या घडामोडींची मला कल्पना नाही. अध्यक्षपदाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत राहणे हे माझे कर्तव्य आहे. ते मी करते.

टॅग्स :Electionनिवडणूक