शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

तारापूरला पुराचा वेढा तर बोईसरला चाळींमध्ये पाणी

By admin | Updated: September 22, 2016 03:22 IST

मुसळधार पावसाने घरे, रस्ते व पूलांचा ताबा घेतल्याने तारापूर-बोईसर, बोईसर-आतेवाडी इ. मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली

बोईसर : मुसळधार पावसाने घरे, रस्ते व पूलांचा ताबा घेतल्याने तारापूर-बोईसर, बोईसर-आतेवाडी इ. मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती तर बेटेगाव पूलावरून पाणी वाहत असल्याने बोईसर-चिल्हाफाटा रस्त्यावर अवजड वाहनांची प्रचंड मोठी रांग लागून वाहतूक खोळंबली होती. एकंदरचच पावसाच्या थैमानापूढे जनजिवन सर्वत्र विस्कळीत झाले होते.तारापूर चे प्रथमिक आरोग्य केंद्र, रोहिदास नगर, गणेशनगर, मुस्लीम मोहल्ला आंबेडकर नगर, तेलीवाडा तारापूरचा पेट्रोलपंप, पाण्याखाली गेला होता. समोरील रस्ता व कुडण, कुरगाव व परनाळी, उमरोळी, आकेवाडी, सरावली येथील रस्त्यावरून पाणी वाहत होते. तर तारापूर आणि सिडको कॉलनी तसेच भिमनगर व भिमनगर सरावली येथील घरात शिरलेल्या पाण्यामुळै धान्य, कपडे, टीव्ही, फ्रीज तसेच घरातील मौल्यवान वस्तू भिजून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.अचानक कोसळलेल्या पावसामुळै तारापूर आणि बोईसर येथील शेकडो कुटुंबाचे नुकसान झाले आहे. सिडकोतील नागरीकांना रात्री तात्पुरता निवारा चहा नसल्याने व्यवस्था महाविर जैन यांनी तर दूपारच्या जेवणाची व्यवस्था अजय ठाकूर यांनी केल्याचे नागरिकांनी सांगितले. तर तारापूर येथील बचत गटाच्या महिलांनी सचिन व संतोष पाटील आणि जि.प. सदस्या शुभांगी कूटे व राजू कुटे इ. सह अनेकांनी वेगवेगळया भागात जेवणाची व्यवस्था केली. दरम्यान, पालघरचे उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट यांनी बोईसर व तारापूरला प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली व पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानी बाबतचा पंचनामा करण्याच्या सुचना त्यांनी संबंधीत यंत्रणेला देऊन पूढील कार्यवाही करण्यांत येईल असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)।आभाळ फाटून प्रचंड मुसळधार पडलेल्या पावसामुळे तारापूर बोईसरसह परिसराला पावसाने अक्षरक्ष: झोडपून टाकले. तारापूरला पूराच्या पाण्याने वेढले होते तर बोईसराला सिडको भीमनगर येथील बैठया चाळीमधून मोठया प्रमाणात पाणी शिरून धो-धो वाहत होते रात्रीच्या गाढ झोपेतच अचानक वाढलेल्या पाण्यामुळे सर्वत्र एकच धावपळ उडाली या पुरामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात झाले आहे.