शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने पाठिंबा काढल्यास सरकार अल्पमतात येईल

By admin | Updated: February 9, 2017 23:27 IST

महापालिकांच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात येईल.

ऑनलाइन लोकमतबारामती/काटेवाडी, दि. 9 - महापालिकांच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात येईल. शिवसेनेनेसह विरोधकांचे संख्याबळ त्या वेळी १५० असेल. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापसह अन्य डाव्या पक्षांचा समावेश आहे. सध्या सरकार जाईल की राहील, अशी अवस्था असल्याचे भाकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास भाजपाचे १३८ आमदार राहतील. त्यावर सरकार टिकणार कसे, अशी टिप्पणीदेखील त्यांनी केली. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर पवार यांनी बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार शुभारंभाच्या सभेत वरील भाकीत केले. त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. भाजपाच्या डोक्यात सत्ता भिनली आहे. त्यांचे मित्रपक्षदेखील नाराज आहेत. शिवसेनेचे मंत्रीदेखील आम्हाला कोणी विचारत नाही, असे सांगतात. राज्यमंत्र्यांना तर अधिकारच ठेवले नाही. निर्णय घेताना भाजपा विचारात घेत नाही, अशी खंत आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला, तर सरकार अल्पमतात येईल. तेव्हा अन्य कोणतेही पक्ष त्यांना पाठिंबा देणार नाहीत, असे सांगून ते मोकळे झाले.भाजपा-शिवसेनेचे सरकार शेतकरीविरोधी आहे. यांना शेतक-यांचे काही देणेघेणे नाही. उत्तर प्रदेश निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकार आश्वासनांच्या घोषणा देत आहे. उत्तर प्रदेशात भाजपा सरकार आल्यास शून्य टक्के व्याजदराने कर्ज आणि कर्जमाफी देण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मग महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असताना येथील शेतकऱ्यांची कर्जमाफी का करीत नाही, असा सवाल त्यांनी केला. सरकार फक्त घोषणा करीत आहे. दलाल, गुंडांना पक्षात प्रवेश देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांना काही निर्णय घेता येत नाही. ज्यांना काही कळत नाही, त्यांना त्यांच्याकडे किंमत आहे. तेच निर्णय घेतात, हेच खरे राज्याचे दुर्दैव आहे, असा टोलाही त्यांनी मारला. बाळासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, सभापती करण खलाटे, गुलाबराव देवकाते आदींची भाषणे झाली. राजेंद्र पवार, संभाजी होळकर, प्रशांत काटे, बाळासाहेब तावरे, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, योगेश जगताप, वनिता बनकर, गौरी काटे उपस्थित होत्या.