शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
4
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
6
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
7
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
8
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
9
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
10
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
11
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
12
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
13
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
14
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
15
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
16
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
17
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
18
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
19
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
20
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

तेव्हा जमले नाही तर...

By admin | Updated: February 19, 2017 03:25 IST

नि वडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘मुंबई महापालिकेत आम्ही फारशा जागा मिळवू शकणार नाही. तेथे शिवसेना सगळ््यात जास्त जागा मिळवणारा

(पंचनामा)- अतुल कुलकर्णीनि वडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘मुंबई महापालिकेत आम्ही फारशा जागा मिळवू शकणार नाही. तेथे शिवसेना सगळ््यात जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरेल,’ असे विधान केले आहे. प्रचाराचे वातावरण शिगेला असताना, अशा वक्तव्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येईल की निराशा? पवारांच्या पत्रकार परिषदेतही हा विषय निघाला. आम्हाला मुंबईत कधीच स्पेस मिळाली नाही. कारण राष्ट्रवादीच्या जन्माच्याही आधी शिवसेना मुंबईत पाय रोवून होती आणि त्यांनी मराठी माणसांवर पकड मिळविली होती. त्यामुळे मराठी मते आम्हाला मिळाली नाहीत आणि अन्य भाषिक मते आमच्याकडे वळवून घेताना आम्हाला फारसे यश आले नाही, पण आम्ही आता त्याकडे विशेष लक्ष देणार आहोत, असे पवारांनी स्पष्ट केले. मात्र, पवारांच्या या उत्तराने हा प्रश्न संपणारा नाही. अवघ्या दोन-अडीच वर्षांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाला आणि त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवावीशी वाटते. त्यासाठी ते सर्वस्व पणाला लावतात. मात्र, राज्यात आणि केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार तब्बल १५ वर्षे असताना त्यांना मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी, असे का वाटले नाही. राष्ट्रवादीला मुंबईत एवढ्या वर्षात स्वत:च्या पक्षासाठी एकही चेहरा का तयार करता आला नाही? राष्ट्रवादीचे सगळे नेते राज्यभरातून मुंबईत यायचे आणि शुक्रवार ते रविवार आपापल्या मतदार संघात परत जायचे. त्यामुळे त्यांना त्यांचा चेहरा मुंबईत तयार करता आला नाही. हे जर खरे असेल, तर मग मुंबईत स्थापन झालेली शिवसेना मुंबईबाहेर, अगदी पश्चिम महाराष्ट्रापर्यंत कशी काय पोहोचली? त्यांचे कोणते नेते मुंबई बाहेरचे होते? या प्रश्नांची उत्तरे या छोट्याशा पंचनाम्यात येणार नाहीत, पण शिवसेनेला मुंबईबाहेर जाऊन जे करता आले, ते राष्ट्रवादीला मुंबईत सत्तेच्या अग्रभागी राहून का करता आले नाही?याचे उत्तर राजकारणात दडले आहे. शिवसेना मुंबईत वाढावी ही त्या वेळच्या काँग्रेसची गरज होती. त्यातून शिवसेनेला सुरुवातीच्या काळात काँग्रेसने वाढवले, पण पुढे बाळासाहेबांनी जोरदार वातावरण तयार केले आणि थेट विधानसभेवर भगवा फडकविण्याचीच घोषणा केली. १९९५ साली त्यांनी ते करूनही दाखवले, पण नंतरच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेला ताकद देण्याचे काम केले. ही सगळी त्यांची राजकीय सोय होती. काँग्रेसचे याच मुंबईत २००९ साली १७ आमदार निवडून आणले होते. पुढे ते त्यांना टिकवता आले नाहीत, पण त्याच्या बरोबरीचे यशही राष्ट्रवादीला मुंबईत कधी मिळाले नाही. मुंबईत स्वत:चा चेहरा तयार व्हावा, म्हणून राष्ट्रवादीने कधीच जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत. मुंबईचे पालकमंत्रिपद मिरवणाऱ्यांनी स्वत:च्या पलीकडे विचार केला नाही. आता आम्ही मुंबईकडे लक्ष देणार आहोत, असे पवार म्हणत असले, तरी वेळ निघून गेलेली आहे. त्यात भर म्हणून की काय, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सर्वात मोठा पक्ष राहील आणि आम्ही मुंबईत फारसे नव्हतोच, त्यामुळे फार काही जागा आम्हाला मिळतील असे वाटत नाही, असे पवारांनी जाहीरपणे सांगितले आहे. दुसरीकडे शिवसेनेची भलामण करण्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ही नवीनच काही सेटिंग तर नाही ना, असाही प्रश्न राष्ट्रवादीच्या उमेदवारांपुढे मतदानाला दोन दिवस उरलेले असताना पडला आहे. राष्ट्रवादीला १५ वर्षांत शिवसेनेला बाजूला सारता आले नाही, ते आता भाजपाला अवघ्या दोन अडीच वर्षाच्या काळात साध्य करता येईल का? की जे त्यांना जमले नाही ते यांनाही जमणार नाही... २३ तारखेला यावरचा पडदा दूर होईल...